Monday, June 23, 2025
Home साऊथ सिनेमा समोर आला मृत्यूच्या काही वेळापूर्वीचा व्हिडिओ, ‘केजीएफ’ स्टार यशसोबत थिरकाताना दिसला पुनीत राजकुमार

समोर आला मृत्यूच्या काही वेळापूर्वीचा व्हिडिओ, ‘केजीएफ’ स्टार यशसोबत थिरकाताना दिसला पुनीत राजकुमार

दाक्षिणात्य चित्रपटातील प्रतिभावान अभिनेता पुनीत राजकुमार याचा शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. जिममध्ये वर्कआउट करताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. पुनीत केवळ ४६ वर्षांचा होता. त्याच्या अशा अनपेक्षित जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त करत आहेत.

पुनीतच्या मृत्यूनंतर त्याचे शेकडो चाहते आणि शुभचिंतक त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करत आहेत. अशातच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पुनीतचा मृत्यूच्या काही तास आधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो सुपरस्टार यशसोबत डान्स करताना दिसत आहे. यावेळी ‘केजीएफ’ स्टार यश आणि पुनीत हे शेवटचे भेटले होते. (Puneeth rajkumar before death last video dancing with kgf star yash)

त्याचा हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ परवाच्या रात्रीचा ‘बजरंगी २’ च्या प्रमोशनच्या कार्यक्रमाचा होता. या व्हिडिओमध्ये पुनीत आणि यश मस्ती करत मंचावर अगदी बिनधास्त अंदाजात डान्स करताना दिसत आहे.

पुनीत राजकुमारने काल सकाळी ‘बजरंगी २’ या चित्रपटाला शुभेच्छा देत ट्वीट केले होते. हे ट्वीट केल्यानंतर अवघ्या ६ तासात त्याने या जगाचा निरोप घेतला. अनेकजण त्याच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करत आहेत. एवढंच काय तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट करून त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

तसेच नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पुनीतसोबत एक फोटो शेअर करून लिहिले आहे की, “नियतीने आपल्याकडून एक अत्यंत प्रतिभाशाली अभिनेता घेतला आहे. त्याचे हे वय या जगातून जाण्याचे नव्हते. येणारी पिढी या महान अभिनेत्याला त्याच्या कामासाठी ओळखेल. त्याचा परिवार आणि मित्रासाठी सांत्वन, ओम शांती.” पुनीतने अनेक चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यांच्या अशा अनपेक्षित जाण्याने सगळ्यांनाच दुःखद धक्का बसला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पुनीतच्या निधनाची बातमी सांगताना, थेट प्रक्षेपणातच फुटला अँकरच्या अश्रूंचा बांध; पाहून पाणावतील तुमचेही डोळे

-पुनीतचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी, कर्नाटक सरकारला घ्यावा लागला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

-कौतुकास्पद! केले गेले पुनीत राजकुमारचे नेत्रदान, वडिलांनी काही वर्षांपूर्वी आख्या कुटुंबासाठी घेतला होता ‘हा’ निर्णय

हे देखील वाचा