Thursday, September 24, 2026
Home अन्य रॉयल डेस्टिनेशन वेडिंग करणार नाहीत अंकिता आणि विकी, मुंबईतच घेणार सात फेरे

रॉयल डेस्टिनेशन वेडिंग करणार नाहीत अंकिता आणि विकी, मुंबईतच घेणार सात फेरे

सध्या मनोरंजनविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. अनेक मोठे सेलिब्रिटी कपल लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या ग्लॅमर क्षेत्राच्या गल्ल्यांमध्ये सुरु आहेत. बॉलिवूडमध्ये विकी कौशल कॅटरिना कैफ आणि राजकुमार यादव पत्ररेखा यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. यात छोटा पडदा देखील मागे नाही. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि मोठी अभिनेत्री असणाऱ्या अंकिता लोखंडेच्या देखील लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. अंकिता तिचा बॉयफ्रेंड असणाऱ्या विकी जैनसोबत डिसेंबर महिन्यात लग्न करत असल्याच्या चर्चा जोरदार रंगताना दिसत आहे. यातच आता एक नवीन माहिती समोर आली आहे.

सेलिब्रिटींची लग्न म्हटले की, डोक्यात येते ते डेस्टिनेशन, ग्रँड, आलिशान लग्न. आता अंकिता आणि विकीचे लग्न म्हटल्यावर ते देखील मोठ्या भव्य पद्धतीने होणार असेच सर्व फॅन्सला वाटत होते, मात्र अंकिता आणि विकी यांचा डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा कोणताही प्लॅन नसल्याचे समजत आहे. डेस्टिनेशन वेडिंग हे सध्याच्या काळात एक स्टेटस सिंबल बनले असून यात अतिप्रमाणात पैसा खर्च होतो. ते दोघेही कोणत्याही पद्धतीचे रॉयल डेस्टिनेशन वेडिंग करणार नाहीये. यासाठी त्यांनी मुंबईमध्येच लग्न करायचे ठरवले आहे.

आता अंकिता आणि विकी त्यांच्या लग्नासाठी मुंबईमध्ये एक फाईव्ह स्टार हॉटेल शोधत आहे. मुंबईमधील हॉटेलमध्येच अंकिता आणि विकी लग्नाचे सर्व विधी करणार आहेत. डिसेंबर महिन्यातील १२, १३, १४ यापैकी एका दिवशी ते लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. मागील अनेक काळापासून विकी आणि अंकिता एकमेकांना डेट करत आहे. आतापर्यंत अनेकदा त्यांच्या लग्नाच्या अफवा देखील आल्या, मात्र त्या सर्व खोट्या ठरल्या. आता पुन्हा त्यांच्या लग्नाच्या चर्चा होत आहे. विकी आणि अंकिता अनेकदा सोबत स्पॉट केले जाते. अंकिता विकी देखील नेहमी एकमेकांसोबतचे फोटो शेअर करतांना दिसतात. नुकताच या दोघांचा एका पार्टीमध्ये लिपलॉक करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रभावी अभिनेत्री असणाऱ्या टिस्का चोप्राने अनेक शॉर्ट फिल्म्सचे लिखाण करत स्वतःला सिद्ध केले उत्तम लेखिका

-वयाच्या पंधराव्या वर्षी फिल्मफेयरने सन्मानित झालेल्या पद्मिनी कोल्हापुरे यांनी एकविसाव्या वर्षी पळून जाऊन केले होते लग्न

-कोणी उडवला थरकाप, तर कोणी पाडली भुरळ; पाहा ‘या’ अभिनेत्रींचा लक्षवेधी ‘हॅलोविन लूक’

हे देखील वाचा