Monday, September 21, 2026
Home मराठी रसिका सुनील लग्नानंतर आता होणार परदेशात स्थायिक? खुद्द तिनेच केला याचा खुलासा

रसिका सुनील लग्नानंतर आता होणार परदेशात स्थायिक? खुद्द तिनेच केला याचा खुलासा

सर्वांची लाडकी अभिनेत्री रसिका सुनील मागच्या महिन्यात १८ ऑक्टोबर रोजी तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबत विवाह बंधनात अडकली. मागील अनेक महिन्यांपासून त्यांच्या रिलेशनबाबत चर्चा चालू होत्या. तसेच त्यांनी सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. त्यातून त्यांच्या अफेअरची सर्वांना चाहूल लागली होती. त्यांच्यातील बॉंडिंग पाहून चाहत्यांना देखील त्यांची जोडी खूप आवडायला लागली होती. नुकतेच काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर ते दोघे लग्न करणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर तिच्या चाहत्यांना तिच्या लग्नाची चाहूल लागली होती. परंतु त्यांनी कोणालाही कल्पना न देता लग्न केले आणि १५ दिवसांनी अधिकृतरित्या ही माहिती सर्वांना दिली.

आदित्य हा परदेशात राहतो त्यामुळे आता लग्न झाल्यावर आपली लाडकी रसिका परदेशात जाणार की काय? असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. तसेच ती आता परदेशात स्थायिक होणार अशी चर्चा चालू आहे. अशातच तिने याबाबत खुलासा केला आहे. (Rasika sunil will settled in abroad after marriage, fans get nervous)

नुकतेच झालेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, “लग्न अगदी माझ्या मनासारखं पार पाडलं. समुद्रकिनारी अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याची माझी इच्छा होती. आम्हीच नाही तर आमच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांनी सुद्धा दैनंदिन ताण विसरून लग्न एन्जॉय करावं, हा यामागचा हेतू होता. तो हेतू सफल झाला. आम्ही अगदी पाय दुखेपर्यंत नाचलो. आदीच्या काकांनी तर आमचं एकत्र नाचतानाचं अप्रतिम असं शिल्पदेखील बनवलं.”

तिच्या करिअरबाबत प्रश्न विचारल्यावर तिने सांगितले की, “आमचं करिअर आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आमचं आमच्या करिअरवर खूप प्रेम आहे. त्यामुळे मी इथेच माझं काम करत राहिन आणि आदित्य लॉस एंजिलिसमध्ये त्याचं काम करेल. दोन वेगवेगळ्या देशात राहूनही आम्ही सुखात राहू, हा विश्वास आहे. हे लॉन्ग डिस्टंस रिलेशनशिप असलं तरी आम्हाला त्याची अजिबात चिंता नाही. आम्ही सर्व गोष्टी सांभाळून घेऊ. रसिका दोन वर्षांपूर्वी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सोडून लॉस एंजिलिसला पुढचं शिक्षण घेण्यासाठी गेली होती. तिथे तिची ओळख आदित्यशी झाली. मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आता आदित्य आणि रसिका पती-पत्नी आहेत. आदित्य बिलागीच्या इंस्टाग्रामच्या पोस्टनुसार तो इंजिनिअर, डान्सर आणि कोरिओग्राफर असून, तो लॉस एंजिलिसमध्ये राहतो.”

तिच्या या वक्तव्यानंतर तिच्या चाहत्यांना हायसे वाटले आहे. शिवाय रसिकाला पुन्हा एकदा पडद्यावर बघायला मिळेल यासाठी सगळेच खुश झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ मराठी अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा

-पारंपारिक वेशभूषेत ‘या’ मराठमोळ्या लावण्यवतींनी दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा! पाहा फोटो

-रितेश भैय्याचा अंदाजच लई भारी! बच्चे कंपनीसोबतचा व्हिडिओ शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

हे देखील वाचा