देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. केवळ सामान्य लोकच नाही, तर अभिनेते-अभिनेत्रीही या उत्सवाचा भरपूर आनंद घेतात. त्याचबरोबर त्यांचे दिवाळीचे फोटोही चाहत्यांबरोबर शेअर करत आहेत. भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीनेही गुरुवारी (४ नोव्हेंबर) कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली आणि फटाकेही फोडले. मात्र, त्यादरम्यान तिच्याजवळील फटाक्याचा स्फोट झाल्याने छोटा अपघात घडला. यात तिला दुखापत झाली नाही. अभिनेत्री राणी चॅटर्जीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
फटाके पेटवताना झाला अपघात
राणीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती पाऊसाप्रमाने जळणारा फटाका पेटवताना दिसत आहे. राणीने हा फटाका पेटवण्याचा प्रयत्न करताच अचानक तो फुटला आणि आजूबाजूला धुराचे लोट पसरले. व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले की, “काल असे घडले. मी आणि सॅमी वाचलो, पण मित्रांनो कृपया सुरक्षित रहा.”
व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल
राणी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती वेळोवेळी तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. राणीने तिचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामावर चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. तो व्हिडिओ अल्पावधीतच व्हायरल झाला आहे. अवघ्या काही तासांत या व्हिडिओला दहा हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. त्याचवेळी शुक्रवारी दुपारपर्यंत दीडशेहून अधिक कमेंट्स आल्या होत्या.
राणी चॅटर्जीने चाहत्यांना दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा
दिवाळीच्या निमित्ताने सर्वजण एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. राणी चॅटर्जीनेही तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने इंस्टाग्राम स्टोरीजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती लहान मुलांसोबत दिसत आहे. ती देखील दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. याशिवाय राणी चॅटर्जीने आकाशात फटाके फोडतानाचे अनेक व्हिडिओही तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?
-करीनाचा चिमुकला जेह दिसला आत्या सबाच्या मांडीवर खेळताना; पाहा ‘हा’ गोंडस फोटो










