कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने चित्रपटगृहे पुन्हा एकदा सुरू झाली असून, मोठ्या प्रमाणात प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्याचबरोबर अनेक निर्मात्यांनी त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच अनेक कलाकारांचे चित्रपटही चांगली कमाई करू लागले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते रजनीकांत यांचा ‘अन्नाथे’ चित्रपट आहे. दक्षिण भारतीय अभिनेत्री कीर्ती सुरेश सध्या रजनीकांत अभिनित तमिळ चित्रपट ‘अन्नाथे’मुळे चर्चेत आहे.
तब्बल १८० कोटी खर्च करून बनलेला हा चित्रपट दिवाळीला म्हणजेच ४ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ‘अन्नाथे’ पाहण्यासाठी देशभरातील सिनेमागृहांमध्ये मोठी गर्दी होत आहे. ट्रेड ऍनालिस्ट मनोबाला विजयबालन यांनी ट्वीट करून या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. मंगळवारपर्यंत या चित्रपटाची जगभरात एकूण १८६.५८ कोटींची कमाई झाली होती. अवघ्या आठवडाभरात चित्रपटाने त्याची किंमत पूर्णपणे वसूल केली आहे. यासोबतच कीर्तीची लोकप्रियताही प्रेक्षकांमध्ये झपाट्याने वाढू लागली आहे.
कीर्तीने रजनीकांत यांच्या चित्रपटासाठी घेतली होती मोठी रक्कम
‘महानदी’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर कीर्तीने साऊथ इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. रजनीकांत यांसोबतच कीर्तीच्या ‘अन्नाथे’मधील अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे. रजनीकांत यांच्या चित्रपटासाठी तिने भरमसाठ फी आकारली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, कीर्तीला रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेसाठी २ कोटी रुपये मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रतिभावान अभिनेत्रीला आतापर्यंत बनलेल्या चित्रपटांमधून सर्वाधिक फी मिळाली आहे. विशेष म्हणजे, सन २०१९ मध्ये कीर्तीला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
#Annaatthe WW Box Office
Day 1 – ₹ 70.19 cr
Day 2 – ₹ 42.63 cr
Day 3 – ₹ 33.71 cr
Day 4 – ₹ 28.20 cr
Day 5 – ₹ 11.85 cr
Total – ₹ 186.58 cr#Rajinikanth #KeerthySuresh #Nayanthara— Manobala Vijayabalan (@ManobalaV) November 9, 2021
‘अन्नाथे’ हा चित्रपट कीर्तीच्या व्यक्तिरेखेभोवती फिरतो. विशेष म्हणजे शिवा दिग्दर्शित या चित्रपटातून तिने केवळ तगडी फीच कमावली नाही, तर रजनीकांत यांच्यासोबत स्क्रीन शेअर करून वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘रंग दे’ फेम अभिनेत्री मनेकाच्या आईने १९८१ मध्ये आलेल्या तमिळ चित्रपट ‘नेत्रिकन’मध्ये रजनीकांत यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.
कीर्ती चिरंजीवीची बनणार बहीण
कीर्तीच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच सुपरस्टार चिरंजीवीसोबत दिसणार आहे. मिहिर रमेश दिग्दर्शित ‘भोला शंकर’ या तेलुगू चित्रपटात ही अभिनेत्री चिरंजीवीच्या बहिणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय कीर्तीकडे अनेक तमिळ, तेलुगू चित्रपट आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘असे’ केल्यास प्रियांका चोप्राला बसू शकतो पती निकचा मार, स्वतः केला खुलासा
-बॉलिवूडमध्ये १४ वर्ष पूर्ण केलेल्या रणबीर कपूरने नाकारले होते ‘हे’ सहा सुपरहिट सिनेमे
-नोरा फतेहीचे ‘कुसु कुसु’ गाणे प्रदर्शित, डान्स मूव्ह्जने चुकवला रसिकांच्या काळजाचा ठोका