Tuesday, February 3, 2026
Home बॉलीवूड सलमान खानला तुरुंगात भेटायला फक्त एकदाच गेली होती आई सलमा, पुन्हा भेट न भेटण्याचे सांगितले कारण

सलमान खानला तुरुंगात भेटायला फक्त एकदाच गेली होती आई सलमा, पुन्हा भेट न भेटण्याचे सांगितले कारण

बॉलिवूड विश्वात भाईजान म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध अभिनेता, सलमान खान लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. आज भलेही सलमान खान खूप मोठा स्टार आहे, पण एक काळ असा होता जेव्हा त्याच्या आयुष्यात सतत चढ-उतार पाहायला मिळत होते. सलमान खान त्याच्या आयुष्यातील कठीण टप्प्यातून जात होता, त्यावेळी त्याचे संपूर्ण कुटुंब त्याच्या पाठीशी उभे होते. सलमान खान त्याची आई सलमा खान यांच्या सर्वात जवळचा आहे. पण जेव्हा सलमान खान तुरुंगात होता, त्या काळात त्याची आई सलमा खान त्याला एकदाच भेटण्यासाठी तुरुंगात गेल्या होत्या.

सलमा खान यांनी केला होता खुलासा
याचा खुलासा खुद्द सलमानची आई सलमा खान यांनी फराह खानच्या शोमध्ये केला होता. सलमानला भेटण्यासाठी त्या तुरुंगात गेल्या नसल्याचे त्यांनी सांगितले होते. सलमा खान म्हणाल्या होत्या की, “मी सलमानला भेटण्यासाठी ठाणे तुरुंगात पोहोचले, तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही. सलमानने आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीला नेहमीच मोकळेपणाने आणि धैर्याने तोंड दिले आहे. सलमानच्या या वृत्तीने मी नेहमीच खूश असते.”

‘असे’ म्हणाले जेलर
सलमान खान आर्थर जेलमध्ये होता. पण जेव्हा सलमा खान सलमानला भेटण्यासाठी तुरुंगात गेल्या, तेव्हा जेलरने त्यांना सांगितले की, “काय माहित याला तुरुंगात का आणले आहे.” सलमा खान यांनी फराहला सांगितले की, त्यानंतर त्या सलमान खानला कोणत्याही तुरुंगात भेटायला गेल्या नाहीत. कारण त्यांना या गोष्टीचे खूप वाईट वाटत होते की, त्याच्यासोबतच असे का होते.

त्या वेळेबद्दल बोलताना सलमान खान फराह खानला म्हणाला की, “मला आनंद आहे की, आईने मला इतर तुरुंगात पाहिले नाही. तुरुंगात जाण्यापूर्वीच मी ठरवले होते की, मी तुरुंगात जात आहे, तसाच तुरुंगातून बाहेर येऊन स्वतःला असेच मेंटेन ठेवेल.”

सलमान खानच्या शेजाऱ्यांना व्हायचा त्रास
सलमानची आई सलमा खान यांनी सांगितले की, जेव्हाही सलमान खान घरी असतो. तेव्हा त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमते, त्यामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पोलिसही माझ्याकडे यायचे आणि सलमानला एकदा हात दाखवून बाहेर ये असे सांगायचे. जेव्हाही सलमान घरी असतो, तेव्हा मी त्याला बाहेर जाऊन हात दाखवायला सांगते जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही.

प्रत्येक मुलीत शोधतो आई
सलमान खानला त्याची आई सर्वात प्रिय आहे. त्याचे वडील सलीम खान यांनीही माध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते की, सलमान खान लग्न न करण्यामागील मुख्य कारण म्हणजे त्याला प्रत्येक मुलीमध्ये त्याची आई दिसते. पण असे होऊ शकत नाही हे त्याला कधीच समजत नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राजकुमार- पत्रलेखाच्या एंगेजमेंटचा व्हिडिओ आला समोर; फिल्मी स्टाईलमध्ये म्हणाला, ‘माझ्याशी लग्न करशील?’

-पॅपराजीने पोझ द्यायला सांगताच भडकला रणबीर कपूर, रागाच्या भरात म्हणाला…

-राजकुमार अन् पत्रलेखाच्या मेहंदी सोहळ्यात पोहोचली हुमा कुरेशी, जोडपे आज अडकेल रेशीमगाठीत

हे देखील वाचा