Monday, June 15, 2026
Home बॉलीवूड अभिनेता नसता तर सलमान खानने केलं असतं ‘हे’ काम; ‘बिग बॉस’च्या सेटवर केला खुलासा

अभिनेता नसता तर सलमान खानने केलं असतं ‘हे’ काम; ‘बिग बॉस’च्या सेटवर केला खुलासा

या दिवसांत सलमान खान त्याच्या आगामी चित्रपट ‘अंतिम’साठी चर्चेत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान अभिनेता नसता तर काय करत असता, हे सांगताना दिसत आहे. सलमान खान सध्या ‘बिग बॉस १५’ होस्ट करताना दिसत आहे. प्रत्येक विकेंडला तो शोमध्ये नवीन धमाका करतो. कधी सलमान विकेंड का वारमध्ये स्पर्धकांची शाळा घेताना दिसतो, तर कधी शोमध्ये पाहुण्यांसोबत मस्ती करताना दिसतो. यावेळीही असेच काहीसे पाहायला मिळाले आहे.

कार्तिक आर्यन सध्या त्याचा ‘धमाका’ चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे. अशा परिस्थितीत तो चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. यादरम्यान कार्तिक आर्यन सलमान खानच्या शो ‘बिग बॉस १५’मध्ये पोहोचला आणि दोघांनी खूप धमाल केली. अलीकडेच, एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये असे दिसते की कार्तिक आर्यन स्टेजवर पोहोचताच, सलमान खानने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. ज्याची उत्तरे अभिनेता मजेशीर पद्धतीने देतो. दरम्यान, तो अभिनेता नसता तर काय झाले असते, असे सलमान खान म्हणतो. यावर कार्तिक म्हणतो, “मग त्या लोकांचे काय होईल?” (salman khan revealed in bigg boss 15 stage if he was not actor he would have work as a director)

व्हिडिओमध्ये सलमान खान म्हणतो की, “कार्तिक तू धमाकामध्ये रिपोर्टरची भूमिका करत आहेस, त्यामुळे मी तुझी परीक्षा घेईन.” सलमान खान पहिला प्रश्न विचारतो की, “तुला तुझी सुट्टी कुठे घालवायला आवडते. हिल स्टेशन किंवा बीचवर.” कार्तिक उत्तरात म्हणतो, “सर पनवेल.” पुढे सलमान विचारतो, “मी अभिनेता नसतो तर काय झाले असते, यासाठी तुमच्याकडे पर्याय नाही.” कार्तिक म्हणतो, “तुम्ही अभिनेता नसता, तर आम्ही काय करत असतो.” यावर प्रतिक्रिया देताना दबंग अभिनेता म्हणतो की, “तू सलमान खान या दिग्दर्शकासोबत काम करत असता आणि सलमान खानला स्पर्धाच नसती उरली. यावर कार्तिक म्हणतो, “सर मला साइन करा.”

त्यांचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युजर्सही यावर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राजकुमार- पत्रलेखाच्या एंगेजमेंटचा व्हिडिओ आला समोर; फिल्मी स्टाईलमध्ये म्हणाला, ‘माझ्याशी लग्न करशील?’

-पॅपराजीने पोझ द्यायला सांगताच भडकला रणबीर कपूर, रागाच्या भरात म्हणाला…

-राजकुमार अन् पत्रलेखाच्या मेहंदी सोहळ्यात पोहोचली हुमा कुरेशी, जोडपे आज अडकेल रेशीमगाठीत

हे देखील वाचा