Monday, April 13, 2026
Home अन्य भारीच ना! मेहंदीच्या रंगात रंगली श्रध्दा आर्या, लवकरच चढणार बोहल्यावर

भारीच ना! मेहंदीच्या रंगात रंगली श्रध्दा आर्या, लवकरच चढणार बोहल्यावर

टेलिव्हिजनवरील ‘कुंडली भाग्य’ ही मालिका खूप लोकप्रिय आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी प्रीता म्हणजेच श्रध्दा आर्या लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. मागील अनेक दिवसापासून तिच्या लग्नाच्या चर्चा चालू आहे. काही दिवसांपूर्वी ती तिच्या लग्नासाठी मुंबईहून नवी दिल्ली येथे रवाना झाली आहे. तसेच तिच्या लग्नाच्या आधीच्या सगळ्या विधी देखील चालू झाल्या आहेत. सोमवारी (१५ नोव्हेंबर) श्रध्दाच्या मेहेंदीचा कार्यक्रम झाला. यावेळी तिच्या मालिकेतील अनेक कलाकार तसेच तिचे मित्र देखील तिथे हजर होते.

माध्यमातील वृत्तानुसार, श्रध्दा १६ नोव्हेंबरला नौदलाच्या अधिकाऱ्यासोबत लग्न करणार आहे. तिच्या लग्नाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत आहे. यावेळी तिच्या मेहेंदी फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी तिच्या हातातील अंगठी देखील दिसत आहे. (Shraddha Arya looks beautiful mehendi ceremony in a purple yellow lehenga )

श्रध्दाने मेहेंदी फंक्शनमध्ये पिवळ्या आणि जांभळ्या रंगाचा लेहंगा घातला होता. तिच्या घरी चाललेल्या या विधीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘कुंडली भाग्य’ मालिकेत तिच्या बहिणीचे पात्र निभवणारी अभिनेत्री अंजुम शेख देखील श्रद्धाच्या मेहेंदी फंक्शनसाठी दिल्लीला‌ पोहचली आहे.

श्रध्दाने तिच्या लग्नाबाबत कोणत्याही गोष्टीचा खुलासा केला नाही. ती ज्या मुलासोबत लग्न करणार आहे, त्या मुलाचे नाव देखील समोर आले नाही. तिने शूटिंगमधून दोन आठवड्याची सुट्टी घेतली आहे. तिच्या लग्नात तिने केवळ नातेवाईक आणि जवळच्या मित्रांना आमंत्रण दिले आहे.

या आधी २०१५ मध्ये जयंत नावाच्या एका मुलासोबत श्रध्दाचा साखरपुडा झाला होता. परंतु त्यांचे मतभेद झाल्याने त्यांचे हे नाते जास्त काळ टिकू शकले नाही आणि त्यांनी साखरपुडा मोडला. तसेच या आधी श्रध्दाने आलम सिंग मक्कडला डेट केले आहे. त्या दोघांनी ‘नच बलिये ९’ मध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्या नात्यात देखील काही गैरसमज झाले आणि या शो संपल्यानंतर काही महिन्यात त्यांचा ब्रेकअप झाला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigg Boss 15: राकेश बापट गेल्यानंतर शमिता शेट्टीलाही काढावं लागलं बाहेर, पण का?

-ओढणीआड लपलेल्या नोरा फतेहीचा देसी लूक पाहून चाहते झाले वेडे, नेटकरी म्हणाले, ‘हाय गर्मी’

-ठरलं तर! अंकिता लोखंडेने व्यक्त केली लग्नाविषयीची भावना, ‘या’ तारखेला घेणार सात फेरे

हे देखील वाचा