‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. मालिकेत ओम आणि स्विटूची प्रेमकहाणी सगळ्यांना खूप आवडली होती. मालिकेत गरीब आणि श्रीमंत यांच्यातील एक आर्थिक आणि वैचारिक दरी दाखवली गेली. ओम हा श्रीमंत असल्याने त्याच्या बहिणीला त्याचे गरीब असणाऱ्या स्विटूसोबत त्याचे लग्न होऊ नये असेच नेहमी वाटायचे. परंतु त्यांच्या प्रेमाने त्यांना पुन्हा जवळ आणले आहे. त्यांचे लग्न ठरले होते. मेहेंदी, संगीत, हळदी असे सगळे कार्यक्रम देखील झाले होते. अगदी लग्नाचा दिवस देखील आला होता. परंतु त्यावेळी ओमची बहिण त्यांचे लग्न मोडते आणि स्विटूचे लग्न मोहितशी होते.
या प्रसंगानंतर प्रेक्षकांनी मालिकेवर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती. प्रेक्षक मालिकेचा राग राग करू लागले होते. अशातच मालिकेत पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आला आहे. ओमच्या बहिणीचे सत्य सगळ्यांना समजले आहे. तसेच पोलिसांनी तिला पकडुन नेले आहे. दुसरीकडे मोहत आणि स्विटूचा घटस्फोट होताना देखील दिसत आहे. (Incomplete love story of sweetu and om will complete soon in yeu kashi tshi mi nandayala serial)
अशातच अशी माहिती समोर आली आहे की, मालिकेत पुन्हा एका ओम आणि स्वीटूची प्रेमकहाणी दाखवणार असून, मालिकेत ते पुन्हा एकदा जवळ आलेले दिसणार आहे. तसेच त्या दोघांची अपूर्ण राहिलेली प्रेमकहाणी आपल्याला पुन्हा एकदा नव्याने अनुभवता येणार आहे. एकमेकांपासून दूर असूनही ओम आणि स्विटूमधील प्रेम जिवंत होते. त्यांच्याबाबत ही बातमी आल्याने त्यांचे चाहते खूपच खुश झाले आहेत. तसेच मालिकेत खूप दिवसांनी आनंद पाहायला मिळणार आहे.
मालिकेत अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर मुख्य भूमिकेत असून, ओम आणि स्वीटू हे दोघे झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय जोडपे बनले आहे. प्रेक्षक त्यांना खूप प्रेम देतात. अन्विताने या आधी ‘गर्ल्स’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘टाईमपास’ या चित्रपटात केतकी माटेगावकर हिच्या मैत्रिणीची भूमिका निभावली होती.
हेही वाचा-
रस्त्यावर लोकांना थांबवून थांबवून फुलं देताना दिसला कार्तिक आर्यन, पण काय आहे कारण?
BIGG BOSS 15: राखी सावंतच्या पतीने केला मोठा खुलासा, स्वतः च्या भूतकाळाबद्दल सांगितले ‘असे’ काही










