‘मुळशी पॅटर्न‘ या सुपरहिट चित्रपटानंतर प्रवीण तरडे (Pravin Tarde) आता कोणता मोठा प्रोजेक्ट घेऊन येणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. अशातच त्यांचा एक मोठा चित्रपट ‘सरसेनापती हंबीरराव‘ (Sarsenapati Hambirrao) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. टिझर प्रदर्शित झाल्यानंतर सगळ्यांना आता चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. प्रवीण तरडे हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहेत. त्यांचा लूक पाहून अक्षरशः शहारे उभे राहिले आहेत. प्रविण विठ्ठल तरडे यांनीच कथा, पटकथा, संवाद आणि चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
भव्य दिव्य ऐतिहासिक सेट, चफकल संवाद आणि लक्षवेधी ऍक्शन सिक्वेन्स असलेल्या अभिनेता प्रविण तरडे दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या टिझरची सगळीकडेच चर्चा आहे. ‘बाहुबली’ फेम साऊथ स्टार प्रभास (Prabhas) याला देखील या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. आज त्याने आपल्या अधिकृत फेसबूक अकाऊंटवर या चित्रपटाचा टिझर शेअर केला आहे. (prabhas and raveena tandon share Sarsenapati Hambirrao teaser)
https://m.facebook.com/story.php?story_fbid=481903036626228&id=100044196081040&sfnsn=wiwspwa
इतकेच नव्हे, तर बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) हिने देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवर या चित्रपटाचा टीझर शेअर करत, दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे चित्रपटाची उत्कंठा अधिकच वाढली आहे.
Pravin Tarde आणि टीम सरसेनापती हंबीरराव या मराठीतील भव्य चित्रपटाला शुभेच्छा???? Best wishes @WriterPravin and team .. looking forward ???????????? pic.twitter.com/sPhpFiXxff
— Raveena Tandon (@TandonRaveena) December 22, 2021
छत्रपती शिवाजी महारज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शौर्य गाथा ‘सरसेनापती हंबीरराव’ या बिगबजेट मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर सोशल मिडियावर लॉंच करण्यात आला. या टीझरला २ मिलियनपेक्षा जास्त हीट मिळाले आहेत. या टिझर मधील चित्रपटाची भव्यता, संवाद आणि ऍक्शन सिक्वेन्स प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. बॉक्स ऑफिस हिट ठरलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटानंतर लेखक, दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे हे भव्य दिव्य असा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत.
हेही वाचा-