Saturday, February 22, 2025
Home कॅलेंडर मुलीचं चित्रपटात काम करणं सुपरस्टार धर्मेंद्रला खटकलं, 6 महिने बोलणंच केलं होतं बंद

मुलीचं चित्रपटात काम करणं सुपरस्टार धर्मेंद्रला खटकलं, 6 महिने बोलणंच केलं होतं बंद

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी 1983 मध्ये हेमा मालिनी  यांच्याशी लग्न केले. हेमा मालिनीशी लग्न करण्यासाठी त्यांना बरेच कष्ट घ्यावे लागले. पहिल्या पत्नीने घटस्फोटासाठी नकार दिल्यानंतर त्यांनी धर्म बदलून हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना इशा देओल आणि अहाना देओल या दोन मुलीही आहेत. दोन्ही मुली त्यांच्या आई इतक्याच कलाप्रेमी आहेत. ईशा आणि अहाना दोघीही उत्कृष्ट डान्सर आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, की त्यांचे वडील धर्मेंद्र यांना त्यांच्या मुलींनी आईसारखे नाचावे किंवा अभिनयात करियर करावे हे अजिबात मान्य नव्हते.

होय, हे अगदी खरे आहे की धर्मेंद्रला आपल्या दोन्ही मुलींनी आईसारखे नर्तक असावे किंवा अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमवावे हे आवडत नव्हते. वास्तविकत: लहानपणापासूनच ईशा आणि अहानाने आपल्या पालकांना चित्रपटांमध्ये काम करताना पाहिले होते. त्याच वेळी, हेमामालिनी देखील घरी नृत्याचा सराव करायच्या. त्यामुळे, ईशा आणि अहाना दोघींनाही नृत्यात आवड निर्माण व्हायला लागली होती. धर्मेंद्र यांचा जरी विरोध असला तरीही हेमामालिनी देखील हट्टी होत्या आणि त्यांनी आपली जिद्द सोडली नाही आणि दोन्ही मुलींना क्लासिकल डान्सर बनवले.

हा खुलासा हेमामालिनी यांनी ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये केला होता. हेमा मालिनी म्हणाल्या होत्या की, ‘मी एक नर्तक आहे आणि मी घरी सराव करताना या दोघी बघायच्या. धरम जी यांना हे आवडत नव्हते. चित्रपटात कोणी येऊ नये, डान्स कोणी शिकू नये असा त्यांचा विचार होता’.

आईचा मुद्दा पुढे नेत ईशा म्हणाली, ‘ते दररोज असे म्हणत असायचे’.

पुढे हेमा मालिनी म्हणाल्या, “मग त्यांनी पाहिले की माझे नृत्य काय आहे आणि लोक त्याबद्दल किती कौतुक करतात, मग त्यांनी ते स्वीकारले.”

मात्र, धर्मेंद्र यांना मुलगी ईशाने चित्रपटात काम करण्याविषयी आक्षेप होता. धर्मेंद्रला त्यांची कोणतीही मुलगी फिल्म लाइनमध्ये जाऊ नये अशी इच्छा होती. पण हेमा मालिनी यांनी यासाठी आपल्या पतीची समजूत काढली आणि ईशाला फिल्म लाईनमध्ये जाण्यासाठी पाठिंबा दर्शविला. ईशाच्या पदार्पणानंतर धर्मेंद्रने तब्बल सहा महिने तिच्याशी बोलने बंद केले होते.

पुढे हेमा मालिनी यांनी सांगितले की, ‘हे काम खूप कठीण होते. यासाठी मला धरमजींपासून बरेच काही लपवावे लागत असे. पण शेवटी त्यांना हे मान्य करावेच लागले.’

ईशाने सांगितले की, ‘पापा (धर्मेंद्र) यांनी तिचा कोणताच चित्रपट पाहिला नाही.’ पुढे, ईशा हसून म्हणाली, “जर लपून त्यांनी एखादा चित्रपट पाहिला असेल तर माहित नाही पण तसे त्यांनी आजपर्यंत पाहिला नाही.”

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
धर्मेंद्र यांनी घातलेला ‘तो’ राडा, ज्यामुळे मोडले होते जितेंद्र आणि हेमा मालिनीचे लग्न, वाचा खास लव्हस्टोरी
धर्मेंद्र यांनी चालत्या गाडीत मुलगा सनी देओलसाठी केला परफॉर्मन्स, चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

हे देखील वाचा