Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

रजनीकांत अण्णाची स्टाईल मारायला गेली ‘शालू’ पण…, पाहा राजेश्वरी खरातचा नवा ट्रेंडिंग व्हिडिओ

rajeshwari kharatचित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटातून अनेक कलाकारांना त्यांची ओळख मिळाली आहे. प्रत्येक वेळेस एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर घेऊन येणे ही नागराज मंजुळे यांची खासियत. २०१३ साली नागराज मंजुळे एक वेगळी कहाणी घेऊन प्रेक्षकांसमोर आले होते. त्या चित्रपटाचे नाव होते ‘फॅन्ड्री.’ या चित्रपटाला खास करून ग्रामीण भागातील प्रेक्षकांनी खूप प्रतिसाद दिला होता.

या चित्रपटाच्या कहाणीसोबत चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री देखील चांगलीच लोकप्रिय झाली. ती अभिनेत्री सगळ्यांची लाडकी शालू म्हणजेच राजेश्वरी खरात. राजेश्वरी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या पारंपरिक लूकपासून ते अगदी हॉट आणि बोल्ड लूकचे ती तिच्या चाहत्यांना दर्शन देत असते. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. (rajeswari kharat share her video on social media)

राजेश्वरीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ती दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा गॉगल घालताना अभिनय करत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “मला माफ करा रजनीकांत सर, परंतु हे फक्त तुम्हीच करू शकता.”

तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. तिच्या अभिनयाचे सगळेजण कौतुक करत आहेत.

राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटातून २०१३ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने २०१७ साली ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. पाहायला गेलं, तर राजेश्वरीने जास्त चित्रपटात काम केले नाही. मात्र, कमी कालावधीत तिने चांगले नाव कमावले आहे. सोशल मीडियावर तिचा लाखोंमध्ये चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिची कोणतीही पोस्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही.

नुकतेच तिची ‘रेडलाईट’ ही शॉर्टफिल्म प्रदर्शित झाली आहे. यामधून तिने समाजातील वेशा व्यवसाय करणाऱ्या महिलांचे थरारक आयुष्य दाखवले आहे. समाजाचा या महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याच्या त्यांनी प्रयत्न केला आहे. यातील राजेश्वरी खरातचा अभिनय पाहून नक्कीच तुमच्या भुवया उंचावतील.

हेही वाचा :

‘रिलसाठी काय पण’, म्हणत अंतरा आणि मल्हारचा नाटू नाटू गाण्यावरील भन्नाट व्हिडिओ समोर

‘आई कुठे काय करते’ मालिकेत लग्न सोहळा चाललाय दणक्यात, संगीताचे फोटो आले समोर

यावर्षी ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘या’ सिनेमांनी मिळवली तुफान लोकप्रियता 

 

हे देखील वाचा