Saturday, April 18, 2026
Home बॉलीवूड अक्षयने कुटुंबासोबत मालदीवमध्ये साजरे केले नवीन वर्षे, गायत्री मंत्राचा पाठ करतानाचा व्हिडिओ व्हायरल

अक्षयने कुटुंबासोबत मालदीवमध्ये साजरे केले नवीन वर्षे, गायत्री मंत्राचा पाठ करतानाचा व्हिडिओ व्हायरल

अगदी सर्वसामान्य लोकांपासून ते कलाकारांपर्यंत शनिवारी (०१ जानेवारी) नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जात आहे. जो तो आपापल्या परीने नवीन वर्ष साजरे करत आहे. कलाकार देखील पार्टी आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नवीन वर्ष साजरे करत आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने आपले नवीन वर्ष मालदीवमध्ये साजरे केले आहे. त्याने मालदीवमधील स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो सकाळच्या सुंदर दृश्याचा आनंद घेताना दिसत आहे. उगवत्या सूर्याला पाहून अक्षय गायत्री मंत्राचा पाठ करताना दिसत आहे. अक्षय सध्या त्याची मुलगी नितारा आणि पत्नी ट्विंकल खन्नासोबत मालदीवमध्ये स्पेशल वेळ घालवत असल्याची माहिती समोर आली आहे.

नवीन वर्षाची सुरुवात केली गायत्री मंत्राने
स्वतः चा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत अक्षयने (Akshay Kumar) लिहिले की, “नवीन वर्ष आणि जुना मी. सकाळी उठलो आणि माझा जुना मित्र सूर्याला नमस्कार केला. दिवसाची सुरुवात कोव्हिड वगळता सर्व नवीन आणि सकारात्मक गोष्टींनी केली. मी सर्वांना चांगले आरोग्य आणि आनंदाच्या शुभेच्छा देतो. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.”

ट्विंकलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते मालदीवला
समुद्रात बांधलेल्या कॉटेजच्या बाहेर उभा असलेला अक्षय कॅमेऱ्याकडे पाठ करून उभा आहे. त्याला गायत्री मंत्राचे पठण करताना पाहणे खरोखरच मनोरंजक आहे. अक्षयची पत्नी आणि लेखिका ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हिचा वाढदिवस २९ डिसेंबरला असतो. त्यामुळे यावेळी ट्विंकलचा वाढदिवस आणि नवीन वर्ष दोन्ही साजरे करण्यासाठी मालदीवमध्ये गेले आहेत.

अक्षय कुमारकडे आहेत अनेक चित्रपट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर नेहमीप्रमाणे अक्षय कुमारचे अनेक चित्रपट एकापाठोपाठ रांगेत उभे आहेत. त्यात ‘पृथ्वीराज’, ‘राम सेतू’, ‘बच्चन पांडे’, ‘रक्षाबंधन’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

तसेच तो अजूनही अनेक चित्रपटांवर सातत्याने काम करत आहे. त्याच्या ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाचीही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा