सर्वांनीच नवीन वर्षाचे स्वागत अगदी धुमधडाक्यात केले आहे. अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचून आपल्या कुटुंबासह नवीन वर्ष साजरे केले. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अनेक कलाकारांनी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण चाहत्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ज्या दोन कलाकारांच्या नजरा खिळल्या आहेत. ते म्हणजे ऋतिक रोशन(Hrithik Roshan) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh). या दोन्ही अभिनेत्यांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांचे शर्टलेस फोटो शेअर केले आहेत, जे चाहत्यांना वेड लावत आहेत.
शर्टलेस होऊन दाखवला जलवा
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ऋतिक आणि रणवीरचे शर्टलेस फोटो शेअर करताच इंटरनेटचा पारा चढवत आहे. प्रत्येकाला या दोन कलाकारांचा लूक आवडला आहे आणि त्यांच्या हॉट लूकचे वेड लागले आहे.
ऋतिकने लिहिले आहे असे कॅप्शन
ऋतिकने आपला फोटो शेअर करून चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोत अभिनेता शर्टलेस सेल्फी घेत आहेत, तर त्याच्या मागे समुद्र दिसत आहे. जे पाहून असे वाटते की, अभिनेता क्रूझ किंवा जहाजावर आहे.
रणवीर सिंग म्हणाला…
रणवीरने हा सेल्फी सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “येणाऱ्या आयुष्याचा पहिला दिवस.” या फोटोमध्ये रणवीरने शॉर्ट्ससोबत मोठा काळा गॉगल घातला आहे जो त्याच्या लूकवर छान दिसत आहे.
अनेक कलाकार गेले बाहेर
नवीन वर्षाच्या सुट्टीसाठी हे दोन्ही कलाकार कुठे गेले याची माहिती मिळाली नाही. पण हे दोन्ही कलाकार मस्त एन्जॉय करत आहेत हे मात्र नक्की आहे. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच रणवीर आणि ऋतिकशिवाय अनेक बॉलिवूड कलाकार सुट्टीसाठी बाहेर गेले आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर रणवीर सिंगचा ‘८३’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तर ऋतिक शेवटचा ‘वॉर’ चित्रपटात दिसला होता.
हेही वाचा-










