Saturday, October 24, 2026
Home › मराठी › शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी अडकले नवीन बंधनात, साखरपुडयाचा फोटो केला सोशल मीडियावर शेअर

शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी अडकले नवीन बंधनात, साखरपुडयाचा फोटो केला सोशल मीडियावर शेअर

मराठी चित्रपटसृष्टीतून अनेक आनंदाच्या बातम्या येत आहेत. अशातच अशी माहिती समोर आली आहे की, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचा साखरपुडा झाला आहे. त्यांनी सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो शेअर करून ही माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. त्यांचा साखरपुडा झाल्याचे समजताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शिवानीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा त्या दोघांचा एक सुंदर फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, शिवानी तिच्या हातातील साखरपुड्याची अंगठी दाखवताना दिसत आहे. ते दोघेही सध्या वेशात दिसत आहे. त्यामुळे त्यांचा हा फोटो पाहून त्यांनी अगदी सध्या पद्धतीने साखरपुडा केला असेल याचा अंदाज येतो. (virajas kulkarni and shivani rangole engagement photo viral on social media)

त्यांनी शेअर केलेल्या या फोटोवर अनेकजण कमेंट करून त्यांना शुभेच्छा देत आहेत. अनेक कलाकारांनी देखील या पोस्टवर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोवर सोनाली कुलकर्णी, रसिका सुनील, आशय कुलकर्णी, ऋतुजा बागवे, अन्विता फलटणकर यांसारख्या अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. तसेच त्यांच्या चाहत्यांना देखील खूप आनंद झाला आहे.

शिवानी आणि विराजस मागील अनेक दिवसापासून रिलेशनमध्ये आहेत. त्यांचे दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे त्यांच्या रिलेशनबाबत आधीपासूनच सगळ्यांना कल्पना होती. परंतु असा अचानक साखरपुडा करून त्यांनी त्यांच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे.

शिवानी आणि विराजस हे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कलाकार आहेत. दोघांनीही मालिकांमध्ये काम केले आहे. विराजसने झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ मालिकेत काम केले आहे. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री गौतमी देशपांडे होती. तसेच शिवानीने स्टार प्रवाहवरील ‘सांग तू आहेस का?’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत होता.

हेही वाचा :

कुठे गायब आहे बॉबी डार्लिंग? अभिनेत्रीने लैंगिकतेवर सोडले मौन; म्हणाली, ‘काम मिळत नाहीये…’

‘आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस पुन्हा जगत आहे’, म्हणत अभिज्ञा भावेने पतीला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

‘बिग बॉस मराठी ३’ मधील ‘ही’ स्पर्धक करणार ‘तुझ्या रूपाचं चांदणं’ मालिकेत एंट्री

 

हे देखील वाचा