मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे ‘प्राजक्ता माळी’. झी मराठीच्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्राजक्ता अनेक चित्रपटांमधून आपल्या भेटीला येतच असते. ‘हंपी’, ‘खो खो’, ‘डोक्याला शॉट’ अशा चित्रपटांमधून तिने तिच्या अभिनयाचे विविध पैलू रसिकांना दाखवले. प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती सतत स्वतःचे नवीन फोटो, व्हिडिओ फॅन्ससोबत शेयर करत असते. नुकताच प्राजक्ताने तिचा एक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
हातात चहाचा कप घेऊन प्राजक्ता सूर्यास्त होताना बघत आहे. अतिशय सुंदर असणारा हा फोटो पोस्ट करताना तिने लिहिले, “या १५ मिनिटांमध्ये shot लागू नये अस वाटतं, मेरी तनहाई और मसाला चाय बस्स…” सूर्यास्त जरी होत असला तरी काही तासांनी पुन्हा सूर्योदय होणारच आहे. असा सकारात्मक विचार या फोटोमधून ती देत आहे.
सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन करताना दिसत आहे. प्राजक्ताने तिच्या अभिनयाने मालिका, सिनेमा आणि नाटक या तिन्ही माध्यमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने तिच्या आगामी ‘लॉकडाऊन’ या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले असून, यात ती अंकुश चौधरीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
प्राजक्ताने २००८ साली ‘तांदळा एक मुखवटा’ सिनेमातून अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर ती स्टार प्रवाहवरच्या ‘सुवासिनी’ या मालिकेतही दिसली. तिने केदार शिंदेंच्या ‘खो खो’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. मात्र, तिच्या करियरचा खरा टर्निंग पॉईंट ठरली झी मराठीची ‘जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका. या मालिकेने तिला स्वतःची एक ओळख देत संपूर्ण मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवून दिली.
त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. हातात असलेल्या प्रोजेक्टमध्ये सर्वोत्तम देणारी आणि प्राजक्ता नेहमी तिचे विविध फोटोशूट देखील करत असते. त्यातील अनेक फोटो ती फॅन्ससाठी सोशल मीडियावर पोस्ट देखील करत असते. प्राजक्ता फिटनेसच्या बाबतीत प्रचंड जागरूक आहे. ती नेहमी तिचे योगा, व्यायाम करतानाचे व्हिडिओ शेयर करत असते.
हेही वाचा-
‘साखरपुड्याच्या पलीकडे आणि लग्नाच्या अलीकडे’, सोनालीने शेअर केलेले ‘ते’ खास फोटो पाहिलेत का?
साडीत खुलून आलं अप्सरेच सौंदर्य, पाहा सोनाली कुलकर्णीचे साडीतील पाच खास फोटो