Thursday, June 26, 2025
Home मराठी पुन्हा सैराट? आर्ची आणि परश्या पुन्हा आले एकत्र, व्हिडिओतून सांगितलं कारण

पुन्हा सैराट? आर्ची आणि परश्या पुन्हा आले एकत्र, व्हिडिओतून सांगितलं कारण

मराठी चित्रपटसृष्टीतील सुवर्ण पानं म्हणून नक्कीच भविष्यात ‘सैराट’ या सिनेमाचा उल्लेख केला जाईल. या चित्रपटाने मराठी इंडस्ट्रीमध्ये कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड तर बनवलेच सोबतच चित्रपटाशी संबंधित सर्वच लोकांना तुफान लोकप्रियता मिळवून दिली. चित्रपटाची कथा, संगीत, गाणी, संवाद, कलाकार आदी सर्वच गोष्टींनी अमाप प्रसिद्धी मिळाली. आज चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पाच वर्षांनंतरही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. या सिनेमातील मुख्य जोडी आर्ची आणि परशाने तर संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले होते. या जोडीने कायम स्वरूपी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. सिनेमांनंतरही या जोडीला लोकांचे खूप प्रेम मिळाले. या सिनेमानंतर दोघेही एकमेकांच्या कामात व्यस्त झाले. मात्र नुकतेच या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.

रिंकू आणि आकाश दोघेही डिनर डेटला गेले होते. या डिनर डेटचे काही फोटो या दोघांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शेअर केले आहेत. या दोघांचे सोबत फोटोपाहून अनेकांनी ते नात्यात असल्याचे म्हटले आहे तर काहींनी ‘सैराट २’ येणार असून त्यासाठीचे ते एकत्र भेटल्याचे सांगितले आहे. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार असल्याचे देखील बोलले जात आहे. आता नक्की खरे कारण काय असेल हे तर त्या दोघांनाच माहित. रिंकूने त्यांच्या फोटोसोबतच काही मजेशीर रिल्स देखील पोस्ट केले आहेत. तर आकाशने देखील त्याच्या स्टोरीवर दोघांचा एक फोटो शेअर करत लिहिले, “खूप खाल्ले यार आता उद्या जास्त कार्डिओ करावे लागेल.” यासोबतच रिंकू गाडी बसून आकाशला बाय म्हणत असल्याचा देखील व्हिडिओ शेअर केला आहे.

Photo Courtesy Instagramiamrinkurajguru

दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘सैराट’ नंतर रिंकू ‘कागर’, ‘मेकअप’ या चित्रपटांमध्ये दिसली. यासोबतच तिने ‘अनपॉज्ड’, ‘हंड्रेड’ या हिंदी वेबसीरिजमध्येही काम केले. रिंकूच्या आगामी सिनेमांमध्ये नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या हिंदी सिनेमाचा समावेश आहे. रिंकूचा हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे. याशिवाय तिने अलिकडेच ‘छू मंतर’ या मराठी सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.

तर आकाश ठोसर ‘सैराट’ नंतर ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’ या सिनेमात दिसला होता. तसेच ‘लस्ट स्टोरी’ या अनुराग कश्यप दिग्दर्शित वेब सीरिजमध्येही आकाशने काम केले. ‘१९६२ द वॉर इन दी हिल्स’ या सीरिजमधील त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले आहे. आकाश देखील रिंकूप्रमाणे ‘झुंड’ या सिनेमातून हिंदी सिनेमात पदार्पण करणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा