Monday, February 2, 2026
Home भोजपूरी Video: भोजपुरी अभिनेत्री त्रिशाकर मधुचा ‘कच्चा बदाम’वर जबराट डान्स, ‘एमएमएस’ लीकमुळे आली होती चर्चेत

Video: भोजपुरी अभिनेत्री त्रिशाकर मधुचा ‘कच्चा बदाम’वर जबराट डान्स, ‘एमएमएस’ लीकमुळे आली होती चर्चेत

सध्या सोशल मीडियावर सगळीकडे फक्त आणि फक्त ‘कच्चा बदाम’ गाण्याचीच चर्चा सुरू आहे. तरुणांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांना या गाण्याने अक्षरश: वेड लावले आहे. या गाण्याची लोकप्रियता इतकी आहे की, आत्तापर्यंत लाखो रील्स या गाण्यावर तयार झाले आहेत. यामध्ये सामान्य लोकांपासून ते सिनेसृष्टीतील मोठमोठ्या कलाकारांचा समावेश आहे. आता यामध्ये आणखी एका भोजपूरी अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. ‘कच्चा बदाम’ गाण्यावरील तिच्या या भन्नाट डान्सने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. कोण आहे ही अभिनेत्री चला जाणून घेऊ.

सध्या भारतात सोशल मीडियावर फक्त ‘कच्चा बदाम’ गाण्याचीच हवा पाहायला मिळत आहे. जिकडे बघावे तिकडे या गाण्याच्या रिल्सने सोशल मीडियाचे तापमान गरम केले आहे. या गाण्याची लोकप्रियता इतकी आहे की काही दिवसांपूर्वी सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ओ अंटावा’ गाण्यालाही लोक विसरून गेले आहेत. या गाण्याच्याही लाखो रिल्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये चित्रपटक्षेत्रातील कलाकारही मागे नाहीत. आता लोकप्रिय भोजपूरी अभिनेत्री त्रिशाकर मधुचा (Trishakar Madhu) या गाण्यावरील डान्स सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये लूज पँट आणि काळ्या रंगाच्या स्टायलिश टॉपमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडिओमधील त्रिशाच्या डान्सने आणि हावभावांनी चाहत्यांना चांगलेच घायाळ केले आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने “#trendingnow #trishakarmadhuofficiaal,” असे कॅप्शन दिले आहे.

तत्पूर्वी या गाण्यावर याआधीही अनेक कलाकारांनी रील्स बनवले आहेत, ज्यामध्ये हरियाणा क्वीन सपना चौधरीचाही समावेश आहे. आता त्रिशाकर मधुच्या डान्सची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. मात्र, याआधी त्रिशा तिच्या एका व्हायरल एमएमएसमुळे खूपच चर्चेत आली होती. यामध्ये ती एका व्यक्तीसोबत रुममध्ये रोमान्स करताना दिसली होती. तिचा हा खासगी व्हिडिओ व्हायरल झाल्याने तिच्यावर सर्वत्र टीका झाली होती.

दरम्यान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेले ‘कच्चा बदाम’ हे गाणे पश्चिम बंगालमधील एका सामान्य बदाम विक्रेत्याने गायले आहे. गावोगावी शेंगदाणे विकत फिरताना भुबन बड्डोकर हे गाणे म्हणत होता, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामुळे भुबन बड्डोकर हा सामान्य शेंगदाणे विक्रेता मात्र रातोरात प्रसिद्ध झाला आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा