सध्या चित्रपट क्षेत्रात नाविन्यपूर्ण विषयावर चित्रपट बनवण्याची स्पर्धा सुरू आहे. समाजातील अनेक ज्वलंत प्रश्नांवर चित्रपट तयार होत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनाही हे चित्रपट खूपच आवडत आहेत. असाच एका नवीन चित्रपट आज यूट्यूबवर प्रदर्शित झाला असून सध्या सर्वत्र या चित्रपटाची चर्चा सुरू आहे.
उत्तर प्रदेशमध्ये सध्या जोरदार निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुका आणि जातीयवाद हे समीकरण ठरलेले असते. यावेळीही उत्तर प्रदेशमध्ये राजकारण तापलेले दिसत असताना याच जातीयवादी राजकारणावर भाष्य करणारी शॉर्ट फिल्म ‘बिस्कुट’ यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा खूपच वास्तवदर्शी आहे.
यूट्यूबवर प्रदर्शित झालेली ‘बिस्कुट’ ही एक प्रेरणादायी चित्रपटाची कथा आहे. आपल्या देशात कशाप्रकारे घाणेरडे राजकारण करून लोकांच्या भावना भडकावून राजकीय पोळी भाजली जाते याची कथाच या शॉर्ट फिल्ममध्ये दाखवली आहे. ही शॉर्ट फिल्म गोरीला शॉर्टस या चॅनेल वर प्रदर्शित करण्यात आली आहे.
या चित्रपटाचे निर्माते संदीप शांत उत्तर प्रदेशमधील खेड्यात वाढलेले असल्याने, चित्रपटाचे शूटिंगही बलरामपुरमध्येच करण्याचा त्यांनी हट्ट धरला होता. चित्रपटात गावातील अनेक नागरिकांनी भूमिका साकारल्या आहेत. ज्यांनी आयुष्यात कधीही कॅमेरा पाहिला नाही, त्यांनीही या फिल्ममध्ये काम केले आहे. यामध्ये आपल्या राजकारण्यांच्या द्वेषी राजकारणाला कंटाळून नायक त्यांचा बदला घेण्याची योजना आखतो, अशी कथा दाखवली आहे.
या वास्तववादी शॉर्टफिल्मचे लेखन अमेरिकेतील व्हर्जिनीया राज्यात राहणार्या अमिष श्रीवास्तव यांनी केले आहे. यामध्ये ट-‘सेक्रेड गेम्स’मधील चितरंजन त्रिपाठीने गावच्या सरपंचांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचा नायक अमरजित सिंग याआधी ‘पाताललोक’मध्ये दिसला होता. ‘बिस्कुट’ शॉर्ट फिल्मचे अनेक मोठमोठ्या कार्यक्रमात कौतुक करण्यात आले होते.
हेही वाचा-










