कर्नाटकातील एका महाविद्यालयातून सुरू झालेला हिजाबचा वाद आता देशभर गाजला आहे. राजकीय व्यक्तींपासून ते बॉलिवूड स्टार्सनीही यावर आपलं मत मांडलं आहे. कर्नाटकातील सरकारी महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुलींना वर्गात जाण्यापासून रोखण्यात आल्याने हा वाद चर्चेत आला. यानंतर अनेक लोक हिजाब आणि बुरख्याच्या समर्थन आणि विरोधात वक्तव्य करत आहेत. बॉलिवूडमध्येही कंगना रणौत, हेमा मालिनी, शबाना आझमी, रिचा चढ्ढा यांसारख्या सेलिब्रिटींनी या विषयावर भाष्य केले आहे. नुकतीच सोनम कपूरने ही यावर आपले मत मांडले आहे. तिच्या या वक्तव्यावर भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
सोनमने (Sonam Kapoor) या विषयावर आपले मत व्यक्त करताना हिजाबची तुलना शीखांनी परिधान केलेल्या पगडीशी केली होती. पगडी घातलेला तरुण आणि हिजाब घातलेल्या महिलेचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत सोनम म्हणाली की, “पगडी का घालणे ही चॉईस असू शकते, पण हिजाब नाही.”
सोनमच्या या कमेंटवर तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले की, “सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर एक अतिशय वादग्रस्त पोस्ट टाकली आहे. सर्वप्रथम मी सोनम कपूरला सांगू इच्छितो की, अशा वादग्रस्त पोस्ट टाकून दोन धर्मांना फाटा देण्याचे कृत्य चुकीचे आहे. ज्याची तुलना तुम्ही दस्तरशी केली आहे, ती शीखांसाठी आवश्यक आहे. गुरु गोविंद सिंग जी यांनी आम्हाला हा सल्ला दिला आहे. ते प्रत्येक शीखसाठी आवश्यक आहे आणि ते आपल्या शरीराचा एक भाग आहे, दागिना नाही.”
सोनमवर संतापून सिरसा पुढे म्हणाले की, “तुमची हिजाबची पगडीशी तुलना करणे चुकीचे आहे. सर्व धर्मांची स्वतःची श्रद्धा आहे. त्या समजुती जपल्या पाहिजेत पण अशाप्रकारे सोनम कपूरने जे जाणूनबुजून केले आहे. हा गैरप्रकार केला जात आहे आणि लोकांना जाणूनबुजून भडकावले जात आहे, हे अत्यंत चुकीचे आहे आणि मी तीव्र निषेध करतो. मला सोनम कपूरला सांगायचे आहे, तुझे काम कलाकाराचे आहे, तू तुझ्या कलाकाराचे काम कर.”
अशी झाली वादाला सुरुवात
जानेवारीमध्ये उडुपीच्या ए कॉलेजमधील काही विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्याबद्दल वर्गात प्रवेश नाकारण्यात आला होता. या प्रकरणाबाबत एका विद्यार्थिनीने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हिजाब घालून वर्गात जाण्याची परवानगी मागितली होती.
हेही वाचा –
- ‘जास्त पोर्न बघणारे लोक नीट किस करू शकत नाहीत,’ ‘या’ अभिनेत्रीने केला तिच्या पहिल्या किसचा अनुभव शेअर
- ड्रग्ज प्रकरणानंतर आयपीएल लिलावात दिसला शाहरूख पुत्र ‘आर्यन खान’, चाहते बोलले ‘शेर का बच्चा’
- घरच्यांचा विरोध झुगारून चित्रपटात आली अन रातोरात स्टार झाली ‘ही’ अभिनेत्री, वाचा तिचा जीवनप्रवास