Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

धक्कादायक ! ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेच्या ‘या’ सदस्याने केली आत्महत्या, प्रेक्षकांमध्ये हळहळ

सुप्रसिद्ध टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ चे लेखक अभिषेक मकवाना यांनी आत्महत्या केली आहे. २७ नोव्हेंबर रोजी अभिषेक हे त्यांच्या घरात पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले. या घटनेमुळे मालिकेचे दिग्दर्शक, निर्माते, कलाकार यांना फार मोठा धक्का बसला आहे.

मालिकेच्या सेट वर सध्या चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये मकवाना यांनी आर्थिक अडचणींचा उल्लेख केला होता. परंतू, मकवाना यांच्या घरच्यांचे म्हणणे आहे की, मकवाना यांची सायबर फसवणूक झाली होती.

अभिषेक यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरच्याना सतत फ्रॉड कॉल्स येत आहेत. त्यांच्या घरच्यांचे म्हणणे आहे की, या फोन कॉल्सवर त्यांच्याकडे पैसे मागितले जात आहेत. त्यांना सांगितले जायचे की, ‘अभिषेक यांनी त्यांच्यानंतर घरच्यांना नॉमिनी ठेवले होते. परंतू, अभिषेक यांचे बंधू जेनिस यांनी त्यांचे सर्व इमेल रेकॉर्ड्स तपासून पाहिले तेव्हा लक्षात आले की अभिषेक यांना कुणीतरी  आर्थिक जाळ्यात अडकवले होते.’

जेनिस यांच्या म्हणण्यानुसार अभिषेक यांनी एका लोन देणाऱ्या अँप द्वारे एक कमी किंमतीचं कर्ज घेतले होते. ज्याचा व्याजदर खूपच जास्त होता. अभिषेक आणि अँप यांच्यातील मेल रेकॉर्ड्स तपासल्यानंतर असे आढळून आले की, अँप कडून अभिषेक यांना गरज नसतानाही लहान लहान रकमा नंतर सुद्धा पाठवल्या जायच्या. ज्यांचा व्याजदर ३० टक्क्यांपर्यंत होता.

अभिषेक यांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचे जेनिस यांचे म्हणणे आहे. अभिषेक यांच्या मृत्यूची बातमी समजताच घरच्यांना फोन वर फोन येऊ लागले आणि पैशांची मागणी होऊ लागली तसेच अपशब्द वापरले जाऊ लागले आहेत.

या साऱ्या फोन कॉल्स पैकी एक फोन म्यानमार तर एक फोन बांग्लादेशमधून तर बाकीचे फोन कॉल्स भारताच्या विभिन्न राज्यांमधून येत आहेत. या सर्व प्रकरणानंतर मालिकेच्या सेट वर म्हणजेच गोकुळधाम सोसायटीतही चिंतेचं वातावरण आहे.

हे देखील वाचा