अभिनेत्री राखी सावंत ही अशी अभिनेत्री आहे जिला चालते-बोलते फिरणारे मनोरंजन मानले जाते. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती तिच्या लेटेस्ट पोस्टमुळे नेहमीच चर्चेचा विषय बनत असते. राखी पती रितेशपासून वेगळी झाली आहे. त्यांचे तीन वर्षांचे लग्न मोडले आहे. अलीकडेच राखीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक निवेदन जारी करून तिच्या चाहत्यांना याची माहिती दिली. आता राखी पती रितेशबद्दल उघडपणे बोलली आहे.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत राखी (Rakhi Sawant) रडत म्हणाली की, “त्याने मला सोडले! मी त्याच्यावर खूप प्रेम केले आणि त्याने मला सोडले. काही आठवड्यांपूर्वी बिग बॉसनंतर आम्ही मुंबईतील आमच्या घरात एकत्र राहू लागलो. पण काल त्याने आपले सामान पॅक केले आणि मला सोडले. तो म्हणाला की, तो कायदेशीर अडचणीत आहे कारण त्याने त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नाही. त्याला आता माझ्यासोबत राहायचे नाही. तो म्हणाला की, त्याला त्याच्या व्यवसायात खूप त्रास सहन करावा लागला. मला यातून जावे लागले. माझ्यासोबत बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर खूप छाननी झाली. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर जेव्हा मला समजले की, त्याला पत्नी आणि एक मूल आहे. तेव्हा माझे मन हेलावले. मी एक स्त्री आणि एका मुलासोबत अन्याय करू शकत नाही. तो मला सोडून गेला आणि सर्व काही संपले.”
त्यांच्या भेटीची आठवण करून देताना राखी म्हणाली मी, “आम्ही व्हॉट्सपच्या माध्यमातून कनेक्ट झालो आणि आम्ही जवळपास ६ महिने गप्पा मारल्या. मग त्याने त्याचे लोकेशन, बँक खात्याचे तपशील आणि इतर गोष्टी देखील पाठवल्या आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याने लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि मलाही माझ्या आयुष्यात कोणासोबत तरी सेटल व्हायचे असल्याने मी तीन वर्षांपूर्वी त्याच्याशी लग्न केले.”
पुढे ती म्हणाली की, “त्यानंतर मी विवाहित असल्याचे सार्वजनिक केले तेव्हा कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. त्यामुळे मी रितेशला माझ्यासोबत बिग बॉसच्या घरात येण्यास पटवले. मी त्याच्यावर खूप प्रेम करते आणि मी त्याला प्रत्येक गोष्टीसाठी माफ करेन. जर तो घटस्फोट घेत असेल आणि त्याला माझ्याकडे परत यायचे असेल, तर त्याला समजले पाहिजे की, मी त्याची वाट पाहत आहे. परंतु जर तो आपल्या पत्नी आणि मुलांसह आनंदी असेल तर देव त्याला आशीर्वाद देईल. पण लग्न आणि प्रेम हे माझ्यासाठी विनोद नाही.” त्याचबरोबर अलीकडेच राखी सावंत बिग बॉस १५ ची स्पर्धकही राहिली आहे.
हेही वाचा –
- ‘जर तुम्ही भाग्यवान असाल, तर…’, म्हणत ऋता दुर्गुळेने प्रतिकसाठी व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने लिहिली रोमॅंटिक पोस्ट
- ‘लव्ह हॉस्टेल’चा ट्रेलर प्रदर्शित, बॉबी देओलच्या क्रूर आणि दमदार भूमिकेने वेधले सर्वांचे लक्ष
- राज कपूर यांनी स्वभावाने लाजाळू असणाऱ्या दिलीप कुमार यांची ‘अशी’ घेतली फिरकी, वाचा भन्नाट किस्सा
- हे ही पाहा :