हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध प्रेमप्रकरण कोणते असा प्रश्न विचारला तर पहिल्यांदा नाव घेतले जाते, ते म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोराचे (Malaika Arora). अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा दोघेही आपल्या नात्याला कधीच माध्यमांपासून दूर ठेवत नाहीत. मलायका आणि अर्जुन दोघेही अनेक दिवसापासून प्रेमात आहेत. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात नुकताच वॅलेंनटाईन डे निमित्ताने दोघांनी आपला फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये अभिनेता अर्जुन कपूरने मलायकाची फिरकी घेतल्याचे दिसत आहे.
वॅलेंनटाईन डेच्या निमित्ताने सर्वांनी आपले प्रेम व्यक्त करत सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले होते. यामध्ये हिंदी चित्रपट जगतातील अनेक कलाकारांचासुद्धा सहभाग होता. हिंदी चित्रपट जगतातील आघाडीची अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे प्रेम प्रकरण तर जगजाहीर आहे. मलायकानेसुद्धा एक रोमँटिक फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या सुंदर आणि रोमँटिक फोटोमध्ये अर्जुन कपूरने मलायकाला घट्ट मिठीत घेतले असून तो तिच्या कपाळावर किस करताना दिसत आहे. फोटोमध्ये अर्जुन आणि मलायकाची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. या व्हायरल फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यामध्ये ट्विंकल खन्ना, सबा खान यांचा समावेश आहे. या फोटोमधून मलायकाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, तर अर्जुन कपूरने मात्र तिची चांगलीच फिरकी घेतली आहे.
मलायकाने पोस्ट केलेल्या फोटोला अर्जुनने मजेशीर रिप्लाय दिला आहे. ज्यामध्ये तो म्हणाला, “मी तुला एक फोटो पाठवला आणि तू माझ्या आधी पोस्ट केलास.” असे म्हणत त्याने मलायकाला चिडवले आहे. त्यावर मलायकाने ही खेद व्यक्त केला आहे. त्यांची ही गोड भांडणे चाहत्यांना खूपच आवडली आहेत त्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हायरल फोटोमध्ये दोघेही काळ्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. हा फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. याआधी अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअपची बातमी समोर आली होती. ज्यावर अभिनेता अर्जुन कपूरने सगळ्या अफवा असल्याचे स्पष्ट केले होते.
हेही वाचा
- Video | कचऱ्याच्या पिशव्यांसोबत ‘रॅम्पवॉक’, तर डस्टबिनसोबत डान्स! पाहा अदा शर्माची अनोखी ‘अदा’
- शिल्पा शेट्टी-राज कुंद्रासोबत मस्ती करताना दिसली छोटी समिशा, अभिनेत्रीने वाढदिवसानिमित्त शेअर केला खास व्हिडिओ
- बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार ‘गंगूबाई काठियावाडी’चा प्रीमियर, आलिया भट्ट मुंबईहून रवाना
हेही पाहा-