Wednesday, June 25, 2025
Home अन्य बोल्डनेस नव्हे, तर ओढणी ड्रेस घालून चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका; पाहा उर्फी जावेदचा लेटेस्ट लूक

बोल्डनेस नव्हे, तर ओढणी ड्रेस घालून चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका; पाहा उर्फी जावेदचा लेटेस्ट लूक

‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद (Urfi Javed) हेडलाईन्सचा एक भाग आहे. ती दररोज अतरंगी आऊटफिटमध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते, ज्यामुळे ती चर्चेचा भाग बनते. ती तिच्या कपड्यांवर विचित्र प्रयोग करत असते, त्यामुळे ती ट्रोलच्या निशाण्यावर येते. उर्फीच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे अनेक लोक तिला ट्रोल करतात, पण ती कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. ती नेहमी तिच्या मनाप्रमाणे वागते. नेहमी बोल्ड कपडे परिधान करणाऱ्या उर्फीने यावेळी चाहत्यांना तिचा पारंपारिक अवतार दाखवला, जे पाहिल्यानंतर चाहतेही तिच्या प्रेमात पडले.

यावेळी उर्फीने विचित्र कपडे सोडून हिरव्या रंगाच्या सूटमध्ये व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिची ओढणी सांभाळताना दिसत आहे. या सिंपल लूकमध्ये उर्फी खूपच सुंदर दिसत आहे. कोणीही तिच्यावरून नजर हटवू शकत नाही. कमेंटमध्ये चाहते तिची भरभरून प्रशंसा करत आहेत. (urfi javed looks beautiful in green suit shares video on social media)

चाहते झाले फिदा
उर्फीने हा व्हिडिओ एका पार्कमध्ये शूट केला आहे. तिने हिरव्या रंगाच्या सूटसोबत कानातले घातले आहेत. मोकळे केस आणि साध्या मेकअपने तिच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे. उर्फीच्या पोस्टवर एका चाहत्याने लिहिले, “तू खूप सुंदर दिसत आहेस.” तर दुसऱ्याने लिहिले, “हाय, खूपच सुंदर.”

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर उर्फीचे अनेक म्युझिक व्हिडिओ नुकतेच रिलीझ झाले आहेत. त्याची ही गाणी रिलीझ होताच व्हायरल झाली आहेत. उर्फीचा म्युझिक व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या खास स्टाइलमध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

हेही वाचा :

हे देखील वाचा