मागील सात दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने संपूर्ण जगात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या युद्धाच्या अतिशय गंभीर आणि भीतीदायक अपडेट आपल्याला टीव्हीवर दिसत असून, या युद्धामुळे केवढ्या मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होत आहे, याचाच अंदाज तर आपण घरत बसूनही लावू शकत नाही. सध्या देश युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करत आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या ह्या आक्रमणावरून रशियाला संपूर्ण जगातून टीकेचा सामना करावा लागत आहे. युक्रेनियन नागरिक देखील जीवाची पर्वा न करता युक्रेन सैन्याला मदत म्हणून रशियन लष्कराला विरोध करताना दिसत आहेत. अनेक मोठे देश युक्रेनला पाठिंबा देताना दिसत असून खुद्द रशियातील नागरिकही या आक्रमणावरून रशियाला घराचा आहेर देताना दिसत आहे.

आज रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाचा सातवा दिवस असून, युक्रेनच्या खेरसान शहरावर रशियाने ताबा मिळवला आणि खारकीव रुसी सैन्य घुसले आहे. खारकीव सोबतच युक्रेनमध्येही मुख्य शहरांमध्ये सतत रशियाचे हल्ले होत आहे. मागील २४ तासात या हल्ल्यांमध्ये २१ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ११२ लोकं गंभीर जखमी झाले आहे. या युद्धामुळे रशियाचं प्रधानमंत्री असलेल्या व्लादिमीर पुतिन याना आता त्यांच्याच देशातील नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. या युद्धामुळे पुतीन यांच्याविरोधात पोस्टरबाजी होत असून, सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटीपर्यंत सर्वच त्यांना विरोध करताना दिसत आहे.

रशियाच्या जेष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री असलेल्या Liya Akhedzhakova यांनी देखील पुतीन यांचा विरोध करत त्यांच्यावर रोष व्यक्त केला आहे. Liya Akhedzhakova या कधीही राजकारणावरील मुद्द्यांवर बोलताना घाबरत नाही. वयाच्या दहाव्या वर्षी Liya Akhedzhakova यांनी स्टालिन याना पत्र लिहीत आपल्या आईच्या टीबीवरील उपचारासाठी आर्थिक मदत मागितली होती. Liya यांनी पुतीन यांच्यावर राग व्यक्त करताना हा हल्ल्या वैयक्तिक कारणावरून केला असल्याचे त्यांनी सांगितले. Liya यांचा जन्म Dnipro या शहरात झाला होता. आजच्या घडीला हे शहर युक्रेनमध्ये आहे.
हेही वाचा :










