Wednesday, June 25, 2025
Home मराठी ‘या’ सिनेमांमधून भाऊ कदमने दाखवले त्याच्या अभिनयाच्या विनोदापलीकडील वेगळे पैलू

‘या’ सिनेमांमधून भाऊ कदमने दाखवले त्याच्या अभिनयाच्या विनोदापलीकडील वेगळे पैलू

मराठी मनोरंजनविश्वात आजपर्यंत अनेक विनोदवीर होऊन गेले आहेत. अगदी दादा कोंडके, अशोक सर्फ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यापासून ते भरत जाधव, सिद्धार्थ जाधवपर्यंत या सर्व लोकांनी त्यांच्या विनोदाचे आणि त्यांच्या अभिनयाचे वेगळेपण नेहमीच सिद्ध केले. यासर्व विनोदवीरांमध्ये एका अभिनेत्याने त्याच्या हटके विनोदाच्या शैलीतून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. अशी ओळख की, या अभिनेत्याचे नाव ऐकूनही चेहऱ्यावर लगेचच एक हास्य येईल. हा विनोदाचा राजा म्हणजे भाऊ कदम. चला हवा येऊ द्या या शोच्या माध्यमातून भाऊने महाराष्ट्रातील सर्वच घरांमध्ये त्याची वेगळी ओळख तर निर्माण केली. आज भाऊला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. भाऊने फक्त ‘चला हवा येऊ द्या‘ या शोमधूनच नाही, तर अनेक मराठी चित्रपटांमधूनही स्वतःच्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू प्रेक्षकांसमोर मांडले आहेत.

नशीबवान :
‘नशीबवान’ हा भाऊ कदमचा सिनेमा 11 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमात कुटुंबवत्सल भाऊ कदम सफाई कर्मचारी असून सर्वसामान्य आयुष्य जगतो. मात्र अचानक त्यांच्या आयुष्यात असे काहीतरी घडते आणि त्याचे नशीब पालटते. भाऊ कदम हे विनोदासाठी ओळखले जातात मात्र या सिनेमातून त्यांनी एक गंभीर भूमिका साकारली होती. अतिशय वास्तववादी वाटणाऱ्या या सिनेमात भाऊ कदम नैसर्गिक रूपात दाखवला गेला होता.

पांडू :
भाऊ कदम यांच्या विनोदी शैलीतला हा तुफान गाजलेला सिनेमा म्हणजे पांडू. डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात भाऊ कदम यांनी पांडू आणि कुशल बद्रिके यांनी महादू या भूमिका साकारल्या आहेत. हे दोघं वगनाट्य, बतावणी करणारे कलाकार असतात. एका राजकीय कार्यक्रमात ते पुढारी असलेल्या बाबासाहेब यांच्या नजरेत येतात. बाबासाहेबांच्या शिफारशीने ते पोलिस खात्यात भरती होतात. एकीकडे पांडू-महादूचा पांडू हवालदार आणि महादू हवालदार होतो, तर दुसरीकडे राजकीय व्यक्तिमत्त्व असलेल्या बाबासाहेबांवर वारंवार जीवघेणा हल्ला होत असतो. महादू हवालदार झाल्यानंतर काहीसा भ्रष्ट होतो तर पांडू प्रामाणिकपणे काम करतो. हे दोघं कशाप्राकारे बाबासाहेबांवर हल्ला करणाऱ्याला पकडतात याची कथा या चित्रपटात पाहायला मिळते.

व्ही आय पी गाढव :
ग्रामीण बाज, ठसकेबाज भाषा आणि दादा कोंडके शैली या तिघांचा मेळ असलेला ‘व्हीआयपी गाढव’ चित्रपट म्हणजे विनोदाची धमाल असणार आहे. चित्रपटाचे नावच विनोदी असून या नावावरूनच सिनेमात किती धमाल मजा पहायला मिळेल याचा अंदाज आपण लावू शकत नाही. हा सिनेमा 2019साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा डॉ. रणजीत सत्रे यांची तर पटकथा डॉ. प्रसन्न देवचके यांची आहे.

शिकारी :
हा सिनेमा 2018साली प्रदर्शित झाला होता. अभिनेत्री बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अनेकजणी कास्टिंग काउचला बळी पडत असल्याच्या बातम्या आपण रोज ऐकतो. अनेक मुलींना या ग्लॅमर जगाचे एक वेगळेच आकर्षण असते. पैसा, नाव, फेम या सर्व गोष्टी अनेकींना भुरळ पडतात, त्यामुळे तुला मुंबईला नेऊन अभिनेत्री बनवेन अशा प्रकारच्या आमिषांना तेथील मुली लगेचच बळी पडतात. या मुली अभिनेत्री बनण्याच्या स्वप्नाच्या मागे इतक्या वेड्या असतात की, त्यांचा गैरवापर केला जातोय हे देखील त्यांना कळत नाही. तुला मी टॉपची हिरोइन बनवेन असे सांगत भोळ्याभाबड्या मुलींवर काय अत्याचार केले जातात हे शिकारी या चित्रपटाद्वारे दाखवण्यात आले आहेत.

सायकल :
एका हलक्या फुलक्या कथेतून आत्मपरिक्षण करायला लावणारी अशी सायकलची कथा आहे. सायकल सिनेमा तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात घेऊन जातो. सिनेमात सायकलवर नितांत प्रेम असलेल्या प्रमुख पात्राचे केशवचे हृद्यस्पर्शी चित्रण आहे. भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव हे दोन चोर एका घरात चोरी करतात. हे दोघं एक सायकलही चोरतात. निराश झालेल्या केशवला आपली सायकल नक्की मिळेल ही आशा आहे. म्हणूनच केशव आपल्या सायकलच्या शोधात घराबाहेर पडतो. पुढे त्याला सायकल मिळते का? त्या चोरांचे काय होते? अडीच अनेक गोष्टींवर हा सिनेमा भाष्य करतो.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॅकलेस ड्रेसमध्ये सई ताम्हणकरचा बाेल्ड अंदाज, फाेटाे व्हायरल
सुष्मिता सेन मिस युनिव्हर्स बनण्यामागे इंदिरा गांधीचा हाेता हात, जाणून घ्या काय आहे कनेक्शन

हे देखील वाचा