Friday, April 3, 2026
Home टेलिव्हिजन ‘संतोषी माँ’ फेम सायंतनी घोषचा कास्टिंग काउचबद्दल मोठा खुलासा; म्हणाली, ‘निर्मात्याने माझ्यासोबत…’

‘संतोषी माँ’ फेम सायंतनी घोषचा कास्टिंग काउचबद्दल मोठा खुलासा; म्हणाली, ‘निर्मात्याने माझ्यासोबत…’

टेलिव्हिजन अभिनेत्री सायंतनी घोष (Sayantani Ghosh) ही छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सायंतनीने एकता कपूरच्या (Ekta Kapoor) ‘नागिन’पासून ‘संतोषी मां’पर्यंत अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे. बाकीच्या कलाकारांप्रमाणेच सायंतनीचा प्रवासही चढ-उतारांनी भरलेला आहे. अलीकडेच अभिनेत्रीने उघड केले आहे की, तिलाही एका वेळी बॉडी-शेमिंग आणि कास्टिंग काउचला सामोरे जावे लागले होते. अलीकडेच, एका वृत्तसंस्थेशी झालेल्या संभाषणात, अभिनेत्रीने संपूर्ण कहाणी शेअर केली आहे.

दिलेल्या मुलाखतीत सायंतनीने कास्टिंग काउचबद्दल सांगितले की, “माझ्या आठवणीनुसार, तरुण वयात मला अशा अनेक कमेंट्सचा सामना करावा लागला आहे. मला एक बाई म्हणाली, ‘तुझी फिगर फ्लॅट नाहीये, तू खूप बारीक आहेस, तुझ्या स्तनाचा आकार बघून वाटतं की तुझे खूप शारीरिक संबंध आले असतील.’ त्या महिलेला वाटले की, जर तुम्ही जास्त शारीरिक संबंध ठेवले तर तुमच्या स्तनाचा आकार वाढतो. मला याचा अर्थ काय आहे, हे देखील माहित नव्हते, मला काहीही समजले नाही. तेव्हा मी अविवाहित होते. मी विचार करत होते की, हे सर्व काय होत आहे? त्यामुळे अशा गोष्टी नकळत घाबरतात.” (santoshi maa actress sayantani ghosh recalls when she faced body shaming and casting couch)

पुढे, अभिनेत्रीने कास्टिंग काउचबद्दल सांगितले की, एका चित्रपट निर्मात्याने तिला काही वेळ एकत्र घालवण्यास सांगितले होते. जेणेकरून तो या भूमिकेसाठी अभिनेत्रीला प्रशिक्षण देऊ शकेल. अभिनेत्री म्हणाली, “त्याला माझी ताकद आणि कमकुवतपणा माहित होता. त्याने मला सांगितले की, मी ही भूमिका साकारू शकणार नाही, हे त्याला माहीत आहे. म्हणून त्याने माझ्यासोबत थोडा वेळ घालवला आणि भूमिका चांगल्या प्रकारे समजावून सांगितली. नंतर तो म्हणाला की, आपण एकमेकांना अधिक जाणून घेण्यासाठी एकत्र जास्त वेळ घालवला पाहिजे.”

अभिनेत्री म्हणाली, “मी या सगळ्याचा सामना केला आहे, कधी कधी ते तुम्हाला उदास करते. तुम्ही स्वतःला विचारू लागता, माझ्यामध्ये काही चूक आहे का? मीच आहे का, जी समोरच्या व्यक्तीला असे वाइब्स देत आहे, की लोक विचार करत आहेत की, ते माझ्याकडे वेगळ्या मार्गाने जाऊ शकतात? तुमची चूक नसली तरी तुम्ही तुमच्या स्वाभिमानावर प्रश्नचिन्ह निर्माण करू लागता.”

दुसरीकडे, सायंतनी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. या ठिकाणी आपले वेगवेगळे फोटो शेअर करून, ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

हे देखील वाचा