सध्या देशभरात विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मिर फाइल्स या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच हा चित्रपट अनेक कारणांनी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यामध्ये कपिल शर्माच्या कार्यक्रमात प्रमोशन करण्यावरुन झालेला वाद चांगलाच गाजला होता. कपिल शर्माने (Kapil Sharma) या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली होती, यामुळे कपिल शर्मावर चौफेर टिका झाली होती. मात्र आता चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी या प्रकरणाबद्दल नवीन खुलासा केला आहे.
याबाबत संपुर्ण माहिती अशी की, द काश्मिर फाइल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कपिल शर्मावर चित्रपटाच्या प्रमोशनला नकार दिल्याचा आरोप केला होता. त्यामुळे अनेकांनी कपिल शर्मावर टिका केली होती. इतकेच नव्हेतर कपिल शर्माच्या कार्यक्रमावर बंदी आणण्याचीही मागणी जोर धरु लागली होती. मात्र याबद्दल आता चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते अनुपम खेर यांनी नवीन खुलासा केला आहे.ते म्हणाले की, “कपिल शर्मा हा एक विनोदी कार्यक्रम असल्याने द काश्मिर फाइल्स सारख्या गंभीर विषय असलेल्या चित्रपटाचे प्रमोशन आम्हाला या कार्यक्रमात करायचे नव्हते, तसा सल्ला मीच निर्मात्यांना दिला होता त्यामुळे या चित्रपटाचे प्रमोशन कपिल शर्माच्या कार्यक्रमात होऊ शकले नाही.”
याबद्दल पुढे बोलताना ते म्हणाले की, “द काश्मिर फाइल्स चित्रपटाच्या टीमला दोन महिन्यांपुर्वीच या कार्यक्रमात येण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. मात्र मीच आमच्या मॅनेजरला सांगुन असे करण्यास नकार दिला होता.” आता अनुपम खेर यांच्या या खुलाशानंतर कपिल शर्माने त्यांचे आभार मानत माझ्यावरील खोटे आरोप खोडून काढल्यासाठी धन्यवाद असे म्हटले आहे. तसेच कपिल शर्माने त्याच्यावर या प्रकरणामुळे टिका करणाऱ्यांवरही निशाना साधत सगळे प्रकरण समजून घेऊन बोलण्याचा सल्ला दिला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा