Monday, February 2, 2026
Home हॉलीवूड मेघन मार्कलच्या सहकलाकाराचा धक्कादायक खुलासा; म्हणाला ‘तिच्यासोबत झोपण्याचा…’

मेघन मार्कलच्या सहकलाकाराचा धक्कादायक खुलासा; म्हणाला ‘तिच्यासोबत झोपण्याचा…’

हॉलिवूडची अभिनेत्री आणि प्रिन्स हॅरीची पत्नी मेघन मार्कल (Meghan Markle) काही नकारात्मक अहवालांमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. मेघनने २०१८ मध्ये इंग्लंडच्या प्रिन्स हॅरीशी लग्न करण्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हा तिच्याबद्दल अनेक अफवा पसरू लागल्या. कारण, त्यापूर्वी ती एक प्रसिद्ध आणि यशस्वी हॉलिवूड अभिनेत्री होती. अशा परिस्थितीत तिने प्रिन्स हॅरीसोबत लग्नाची घोषणा करताच तिच्याबद्दलच्या नकारात्मक बातम्यांनी जोर धरला. आता नुकताच मेघन मार्कलचा को-स्टार सायमन रेक्सने (Simon Rex) मेगन मार्कलबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.

सायमन रेक्स ज्याने एकदा मेघन मार्कलसोबत स्क्रीन शेअर केली होती. त्याने दावा केला आहे की, त्याला एकदा $७०,००० (सुमारे ५३ लाख रुपये) ऑफर करण्यात आली होती आणि त्या बदल्यात त्याने मेघन मार्कलसोबत झोपल्याचा दावा केला होता. सायमन रेक्सने एका मुलाखतीत संपूर्ण घटनेचा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, मेघन मार्कलसोबत झोपण्याचा दावा करण्यासाठी त्याला ७० हजार डॉलर्सची ऑफर देण्यात आली होती.

मेघन मार्कलने सायमन रेक्ससोबत ‘कट्स’मध्ये काम केले आहे. २००५ मध्ये आलेल्या या शोच्या एकाच एपिसोडमध्ये दोघे एकत्र दिसले होते. यादरम्यान, मेघन मार्कल एक यशस्वी अभिनेत्री असताना सायमन इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्यासाठी धडपडत आहे.

सायमनने सांगितले की, तो आर्थिक संकटातून जात असताना त्याला ही ऑफर कशी दिली गेली. त्याने सांगितले की, मेघन मार्कलसोबत शारीरिक संबंध असल्याचा दावा करण्यासाठी त्याला मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली होती. तो म्हणतो की, “त्यावेळी माझा खिसा पूर्णपणे रिकामा होता. मला पैशाची खूप गरज होती. पण, तसे करण्यापेक्षा फूड स्टॅम्पवर जगणे माझ्यासाठी सोपे आहे. म्हणून मी पब्लिकेशनची ऑफर नाकारली.”

सायमनने सांगितले की, जेव्हा त्याने पब्लिकेशनची ही ऑफर नाकारली तेव्हा मेघनने त्याला धन्यवादाची नोट देखील पाठवली. सायमन म्हणतो की, “ती म्हणाली की, मला हे जाणून आवडले की, जगात अजूनही चांगली माणसे आहेत.” सायमन म्हणतो की, आजही त्याने मेघनची ही नोट फ्रेम करून घरात ठेवली आहे. सायमनने यासंदर्भात एक ट्वीट देखील केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा