Sunday, February 8, 2026
Home बॉलीवूड ‘नाटकांमुळेच मला माझ्यातली क्षमता समजली आणि…’ अभिनयात यश मिळवण्याचा आयुष्मानचा मंत्र

‘नाटकांमुळेच मला माझ्यातली क्षमता समजली आणि…’ अभिनयात यश मिळवण्याचा आयुष्मानचा मंत्र

भारतीय सिनेसृष्टीतील अतिशय प्रतिभावान आणि कंटेंट अभिनेता म्हणून आयुष्मान खुराणा ओळखला जातो. आयुष्मान आज ज्या भूमिकांसाठी आणि ज्या चित्रपटांसाठी ओळखला जातो त्यामागे त्याच्या स्ट्रीट थिएटरचा सर्वात मोठा असल्याचे म्हटले जाते. आज आयुष्मान लहान बजेटमधील सिनेमे देखील स्वतःच्या बळावर मोठ्या प्रमाणात हिट करताना दिसतो. त्याने तब्ब्ल पाच वर्ष थियेटर केले. आयुष्मानने त्याच्या कॉलेज जीवनात शिमला येथील गेयटी थिएटरमध्ये अनेक नाटकांमध्ये काम केले. याशिवाय तो त्याच्या कॉलेजमधील ‘आगाज’ आणि ‘मंचतंत्र’ ग्रुपचा फाउंडर देखील होता. हे ग्रुप आजही चंदिगढमध्ये सक्रिय आहेत.

आज जागतिक थियेटर डे असून, यानिमित्ताने आयुष्मानने सांगितले की, “अभिनयासोबत माझे नाते स्ट्रीट थियेटरपासूनच जोडले गेले. यामुळेच माझ्या मनात विश्वास निर्माण झाला की, मी माझ्या प्रतिभेच्या बळावर लोकांचे मनोरंजन करू शकतो. स्ट्रीट थियेटरने माझ्यात असलेल्या एका निडर कलाकाराला जन्म देण्याची सुरुवात केली. मी जोखीम पत्करायला देखील तयार झालो. यासाठी मी माझ्या स्ट्रीट थिएटरचा खप आभारी आहे. यानेच मला माझ्या आयुष्याचे लक्ष दिले.”

पुढे आयुष्मान म्हणतो की, “माझ्या नजरेत थियेटर हे आत्मपरीक्षण करण्याचा उत्तम मार्ग आहे. हे आपला समाज आणि आपण काय बनू इच्छितो याचे समीक्षण करण्याचा आणि एका अशा जगाचा मार्ग सुचवू शकतो जो सध्या अस्तित्वातच नाही. मी थिएटरमधून खूप काही शिकलो. थियेटर आपल्या समोर आपल्यातील सर्व क्षमतांना घेऊन पुढे जाऊन काम करण्याचे आव्हान देत असतो. यामुळे तुम्ही प्रेक्षकांसोबत दोन्ही बाजुंनी आणि खोलवर जोडले जाऊन त्यांचं मनोरंजन करू शकतात. मी थिएटरमधून शिकलेल्या गोष्टींचा वापर माझ्या स्क्रिप्ट निवडण्यासाठी आणि अभिनयासाठी करत असतो.”

संकोच या एका गोष्टीपासून आयुष्मानला सुटका थियेटरमुळेच मिळाली. याबद्दल तो म्हणाला, “विक्की डोनर’ मधील भूमिका निभवण्यापासून शुभमंगल सावधान, शुभमंगल ज्यादा सावधान, चंडीगढ़ करे आशिकी मधील भूमिकांपर्यंत प्रत्येक भूमिका करण्यासाठी माझे मनोबल थियेटरमुळेच वाढले. थिएटच्या कलाकारांसाठी माझ्या मनात मोठा आदर आहे. जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी उत्कृष्ट सादरीकरणासाठी आणि प्रोडक्शन बघण्यासाठी वेळ काढून जातो.” आयुष्मान लवकरच अनुभव सिन्हा यांच्या ‘अनेक’ अनुभूती कश्यप यांच्या ‘डॉक्टर जी’ अन अनिरुद्ध अय्यर यांच्या ‘ऍक्शन हिरो’ सिनेमात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा