Saturday, June 21, 2025
Home मराठी नववधू मानसी नाईकचे नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाजात फोटोशूट, चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस

नववधू मानसी नाईकचे नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाजात फोटोशूट, चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस

‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे लाखो प्रेक्षकांच्या मनावर गारुड निर्माण करणारी आणि मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. तिला एक उत्कृष्ट नृत्यांगना म्हणूनही ओळखले जाते. तिचे गेल्याच महिन्यात आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरासह शुभमंगल अगदी थाटामाटात पार पडले. आपल्या नववधूच्या लूकमध्ये तिचा अंदाज अगदी मनमोहन आणि घायाळ करणारा होता.

गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात साखरपुडा पार पडला होता. आपल्या सोशल मीडियावर तिने हे फोटो शेयर करत आपल्या चाहत्यांना ही गोष्ट शेयर केली होती.

साखरपुडा असो, प्री वेडिंग शूट असो किंवा उखाणा घायचा व्हिडीओ असो, तिचे प्रदीप खरेरा सोबचे हे फोटो नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात. सोशल मीडियावर सक्रिय असणारी मानसी हिने नुकताच वेलेन्टाइन दिवसाचे औचित्य साधून आणखी एक फोटो शेअर केला आहे. त्यात तीने प्रदीप सोबत आपला पाहिला वेलेन्टाइन डे साजरा केल्याचे दिसत आहे. या फोटोत प्रदीपने मानसीला चक्क आपल्या खांद्यावर उचलले आहे. प्रदीपने देखील तिच्या या फोटोवर कमेंट करत आपले प्रेम व्यक्त केले.

मानसीच्या चाहत्यांना हा फोटो इतका आवडला आहे की त्या फोटोवर तीस हजारांच्या घरात लोकांनी पसंती दर्शविली असून अजूनही प्रतिक्रीया येत आहेत.

तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच मानसीने आणखी एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता, ज्यात तिला सीमा शिंदे हिने जॅकेट गिफ्ट केले.

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून उतीर्ण झालेल्या मानसी नाईकने २००७ साली पुष्कर जोग सोबत जबरदस्त या चित्रपटाद्वारे चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. ई टीव्ही मराठीच्या चार दिवस सासूचे या मालिकेत तीने मुख्य नायिकेची साकारलेली भूमिका ही विशेष गाजली. त्यानंतर वाट बघतोय रिक्षावाला आणि बाई वाड्यावर या दोन्ही गीतांनी तिला एक विशेष ओळख मिळवून दिली. फक्त लढ म्हणा या चित्रपटात देखील आयटम सॉंगवर तिने नृत्य केले होते. ते देखील फॅन्सला प्रंचड आवडले होते.

मानसीचा पती प्रदीप हा आंतरराष्ट्रीय बॉक्सर असून त्याने नावाजलेल्या स्पर्धा जिंकल्या आहेत. एवढेच नव्हे तर मिस इंडिया युनायटेड कॉन्टिनेट २०१८ चा तो विजेता असून एक मॉडेल आणि अभिनेता म्हणून ओळखला जातो.

मानसीप्रमाणेच तो देखील सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या व्यायामाचे आणि मॉडेलिंगचे फोटो तो शेयर करत असतो.

हे देखील वाचा