Friday, March 13, 2026
Home साऊथ सिनेमा पाहा दक्षिणेतील सुपरस्टार महेश बाबू व मराठमोळ्या नम्रता शिरोडकराची मुलगी सिताराचे क्युट फोटो

पाहा दक्षिणेतील सुपरस्टार महेश बाबू व मराठमोळ्या नम्रता शिरोडकराची मुलगी सिताराचे क्युट फोटो

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार ‘महेश बाबू’ आपल्या स्टाईल आणि आपल्या दमदार अभिनयासाठी सर्वत्र ओळखला जातो. महेश बाबूने आपल्या करिअरमध्ये एका पेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. त्याने त्याचे चित्रपट सृष्टीतील काम सांभाळत आपल्या कुटुंबाला देखील तेवढाच वेळ दिला आहे. महेश बाबू त्याच्या चित्रपटांसाठी जेवढा चर्चेत असातो, तेवढाच तो त्याच्या कुटुंबांशी संबंधीत गोष्टींमुळेही प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतो. परंतु आता त्याची मुलगी ‘सितारा घट्टामनेनी’ ही देखील खूपच चर्चेत आहे. नुकतेच सिताराच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटोज् शेअर केले गेले आहेत, ज्या फोटोजमध्ये सितारा खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोजला पाहून प्रत्येक प्रेक्षकाची नजर फक्त सितारावर खिळली होती.

8 वर्षाच्या या सिताराचे फोटोशूट केले आहे, तिचे हे फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे. सितारा या फोटोजमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोजमध्ये सितारा खूपच क्यूट आणि कॉन्फिडन्ट दिसत आहे. गुलाबी रंगाचा शॉर्ट फ्रॉक घालून तिने वेगवेगळ्या पोझमध्ये हे फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये तिची स्माईली प्रेक्षकांना तिच्याकडे आकर्षित करत आहे. तिच्या या फोटोजला इंस्टाग्रामवर खूपच प्रेम मिळत आहे. तसेच सगळे प्रेक्षक तिचे खूप कौतुक देखील करत आहेत.

सितारा ही खूपच हुशार मुलगी आहे. तिची आई ‘नम्रता शिरोडकर’ ही नेहमीच तिचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मिडियावर शेअर करत असते. सिताराला देखील तिच्या आई वडीलांप्रमाने स्टार व्हायचे आहे. त्या दोघांसोबतचे तिचे मस्ती करतानाचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहे. या आधी देखील सिताराने अनेक वेळा फोटो शूट करून आपले फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सिताराने मागच्याच वर्षी इंस्टाग्रामवर पदार्पण केले आहे आणि अवघ्या एका वर्षात तिच्या फोलवर्सची संख्या लाखोंच्या घरात पोहचली आहे. सिताराला आतापर्यंत 3 लाख पेक्षाही अधिक फॅन्सने फॉलो केले आहे. तिचे फोटोज् इंस्टाग्रामवर पोस्ट झाल्यानंतर काही वेळातच हजारो लाईक्स मिळवतात.

हे देखील वाचा