Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘राजकारण्याने कमावलेली किती संपत्ती असावी?’ सवाल विचारत विवेक अग्निहोत्री यांनी केली शरद पवारांवर टीका

सध्या देशभरात विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटाने फक्त मनोरंजन क्षेत्रातच नव्हेतर भारताच्या राजकारणातही चांगलेच वातावरण तापवले आहे. चित्रपटाचे काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले होते. काही राज्यांनी या चित्रपटाला टॅक्स फ्री केल्याचीही माहिती समोर आली होती. मात्र या चित्रपटाने देशात अशांतता निर्माण केले आहे असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सडकून टिका केली होती. आता यावर चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पहिल्यांदाच उत्तर दिले आहे.

sharad pawar and kashmiri file
Photo Courtesy : Instagram/pawarspeaks and
vivekagnihotri

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, सध्या देशभर गाजत असलेला चित्रपट द काश्मिर फाइल्स सगळीकडे चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी टिका केली होती. तसेच त्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मान्यता द्यायला नको होती अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर आता विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काही दिवसांपुर्वी मी आणि माझी पत्नी विमान प्रवासा दरम्यान शरद पवारांना भेटलो होतो, त्यावेळी त्यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या होत्या” असे म्हटले आहे. विवेक अग्निहोत्रीने अलिकडेच केलेल्या ट्विटमध्ये या भेटीचा उल्लेख करताना “मी शरद पवार यांची विमानात भेट घेतली होती. यावेळी मी त्यांच्या पायाही पडलो, त्यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या मात्र माध्यमांसमोर त्यांना काय होते माहित नाही. मी त्यांचा सन्मान करतो.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

याआधी आपल्या पक्षाच्या दिल्ली युनिटच्या अल्पसंख्याक विभागाच्या अधिवेशनाला संबोधित करताना शरद पवार म्हणाले होते की, “अशा चित्रपटाला प्रदर्शनासाठी मान्यता मिळायला नको होती, पण त्याला करातूनही सूट देण्यात आली. देशाला एकसंध ठेवण्याची, ज्यांच्यावर देश बांधून ठेवण्याची जबाबदारी आहे, तेच लोकांना संताप निर्माण करणारे, अशांतता निर्माण होणारे चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.” यापूर्वी 29 मार्च रोजी शरद पवार यांनी आपल्या एका ट्विटमध्ये “आजच्या द्वेषाच्या आणि खोट्या राजकारणाच्या युगात काश्मिरी पंडितांच्या समाधाना ऐवजी राजकीय फायद्याच्या शोधात असलेल्या तरुणांनी एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे.” असे मत व्यक्त केले होते.

शरद पवारांच्या या ट्विटवर विवेक अग्निहोत्री यांनी आज उत्तर दिलं आहे. शरद पवारांच्या या ट्विटवर कमेंट करताना विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले की, “आदरणीय शरद पवार जी, भारतासारख्या गरीब देशात, तुमच्या मते, एखाद्या राजकारण्याने त्याच्या क्षमतेने कमावलेली किती संपत्ती असावी? भारतात एवढी गरिबी का आहे, हे तुमच्यापेक्षा जास्त कोणाला माहीत आहे, देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो, सदबुद्धी देवो सदिच्छा.” या ट्विटमधून विवेक अग्निहोत्रीने शरद पवार यांच्यावर टिका केली आहे. त्यामुळे आता हा वाद चांगलाच रंगणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा