Wednesday, February 25, 2026
Home बॉलीवूड नव्या नवरदेवाचा अन नवरीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, रोमॅंटिक डान्सवर चाहते झाले फिदा

नव्या नवरदेवाचा अन नवरीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, रोमॅंटिक डान्सवर चाहते झाले फिदा

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt)  शाही विवाह सोहळा १४ एप्रिलला मोठ्या जल्लोषात पार पडला. अनेक दिवसांपासून या लग्नाच्या बातम्या समोर येत होत्या. त्यांच्या चाहत्यांना आणि चित्रपट जगतातील अनेकांना या लग्नाची उत्सुकता लागली  होती. शेवटी या शाही विवाह सोहळ्याला मुहूर्त सापडला आणि हा विवाह सोहळा पार पडला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सर्वत्र या लग्नाचेच फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. लग्नाचा सोहळा पार पडल्यानंतर ग्रेंड सिसेप्शन पार पडले ज्यामध्ये नव दांपत्याने भन्नाट डान्स केला ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, सध्या सोशल मीडियावर आलिया आणि रणबीर कपूरचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. जो रणबीर आणि आलियाच्या लग्नानंतर झालेल्या रिसेप्शन सोहळ्याचा असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये नववधू आलिया आणि वर रणबीर कपूरचा रोमँटिक डान्स पाहायला मिळत आहे. चल छैंय्या छैंय्या गाण्यावरील या डान्समध्ये दोघेही चांगलेच थिरकताना दिसत आहेत.

यावेळी लाल गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेली आलिया खूपच मनमोहक दिसत आहे. रणबीर कपूरच्या गळ्यात हात घालून ती नाचण्यात दंग झाली आहे तर रणबीरही आलियाच्या हातात हात घालून डान्स करताना दिसत आहे. सध्या या गोड जोडीचा डान्स व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.त्यावर त्यांच्या चाहत्यांनीही सुंदर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान आलिया आणि रणबीरच्या प्रेम प्रकरणाची अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा रंगली होती. आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत रणबीर आणि आलियाने लग्नाची गाठ बांधली आहे. आता दोघेही लवकरच सुट्टीसाठी परदेशी जाणार असल्याचीही बातमी समोर आली आहे. रणबीर आणि आलिया दोघेही हिंदी चित्रपट जगतातील यशस्वी कलाकार असून दोघांनीही बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा