आपल्या हॉट आणि बोल्ड अदांसाठी ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या एमटीव्ही स्प्लिट्सविला १३ ची शूटिंग करत आहे. यादरम्यान ती आपले फोटो आण व्हिडिओ सातत्याने शेअर करत आहे. नुकतेच तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हटके आणि नवीन अंदाजातील फोटो शेअर केले आहेत, जे काही क्षणातच व्हायरल झाले असून, चाहत्यांना खूपच आवडत आहेत.
सनीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये दक्षिण भारतीय लूक धारण केला आहे. यासोबतच ती समुद्र किनारी होडीवर बसलेली दिसत आहे. या फोटोत तिने कपाळावर टिळाही लावला आहे.
नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्ये सनी अत्यंत सुंदर दिसत आहे. तिने आपले फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “देवाच्या या देशावर मला प्रेम झालंय.” यासोबतच तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवरही हे फोटो शेअर केले.
यापूर्वीही सनी लिओनीने स्विमिंग पूलमध्ये अनोख्या अंदाजात उडी मारतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओलाही चाहत्यांनी खूप पसंत केले होते. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. सनीच्या खूप कमी चाहत्यांना कदाचित माहिती नसेल की, सनीने ‘बिग बॉस ५’मध्येही एंट्री केली होती.
सनीच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर तिने चित्रपट कारकीर्दीची सुरुवात महेश भट्ट दिग्दर्शित ‘जिस्म २’मधून केली होती. त्यानंतर सनी बॉलिवूडमध्ये चांगली सक्रिय आहे. सध्या ती दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही आपला हात आजमावताना दिसत आहे. लवकरच ती विक्रम भट्ट यांच्या ‘अनामिका’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.
सनीने आतापर्यंत ‘वन नाईट स्टँड’, ‘बेईमान लव्ह’, ‘द व्हर्जिनिटी हिट’, ‘एक पहेली लीला’ यांसारख्या हॉट सिनेमांमध्येही काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सनी लिओनीने वाढवला इंटरनेटचा पारा, बिकिनीमधील बोल्ड फोटो केला शेअर, चाहतेही झाले घायाळ
-सनी लिओनीच्या नऊवारीमधील मराठमोळ्या लुकने चाहते घायाळ! फोटोवर पडतोय कमेंट्सचा पाऊस