आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांचे लग्न खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच आलियाने मेहंदी सेरेमनीची झलक दाखवली होती. त्यानंतर तिने वेडिंग फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती पती रणबीरसोबत नाही तर दुसऱ्या कोणासोबत तरी दिसत आहे.
शेअर केले फोटो
आलिया भट्टने इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती वधूच्या रुपात खूपच सुंदर दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये ती मांजरीला घेऊन पोझ देत आहे. आलिया अनेकदा मांजर एडवर्डसोबतचे फोटो शेअर करत असते. लग्नानंतर तिने तिला सासरीही नेले आहे. त्याचवेळी, दुसऱ्या फोटोमध्ये आलिया कॅमेऱ्यासमोर हसत पोझ देताना दिसत आहे. आलियाच्या या फोटोंवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (alia bhatt poses with her cat edward in new photos from wedding)
आलियाचा लूक
फोटोंमध्ये आलिया सब्यसाचीने डिझाइन केलेल्या पांढऱ्या रंगाच्या साडीत सुंदर दिसत आहे. याशिवाय तिने सोन्याचे दागिने घातले आहेत. आलियाच्या गळ्यात चोकर, हाताला मेहंदी, कानात झुमके पाहायला मिळतात. या ब्राइडल लूकमध्येच आलियाने रणबीर कपूरसोबत सात फेरे घेतले.
१४ एप्रिलला केले लग्न
याआधी आलियाने मेहंदी सेरेमनीचे फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती रणबीर कपूर, जवळचे मित्र आणि कुटुंबासोबत दिसली होती. रणबीर आणि आलियाचे १४ एप्रिल रोजी लग्न झाले, ज्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा