Sunday, June 22, 2025
Home हॉलीवूड Merle Oberon | हॉलिवूडची ‘ती’ अभिनेत्री जिने आयुष्यभर लवपलं भारतात जन्मल्याचं सत्य, पण का?

Merle Oberon | हॉलिवूडची ‘ती’ अभिनेत्री जिने आयुष्यभर लवपलं भारतात जन्मल्याचं सत्य, पण का?

मेर्ले ओबेरॉन (Merle Oberon) एक प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री होती, ज्यांनी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांना वेड लावले. मर्लेचा जन्म मुंबईत झाला, पण त्यांनी आयुष्यभर हे गुपित ठेवले. अमेरिकास्थित लेखक मयुख सेन (Mayukh Sen) यांनी २००९ मध्ये पहिल्यांदा जगाला या सत्याची जाणीव करून दिली. त्यांनी सांगितले की ओबेरॉन या ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या दक्षिण आशियाई वंशाच्या पहिल्या अभिनेत्री होत्या.

‘यामुळे’ लपवले सत्य
ओबेरॉनची कथा दक्षिण आशियाई दृष्टीकोनातून जगासमोर मांडण्यासाठी मयुख सेन आता त्यांच्या चरित्रावर काम करत आहेत. मेर्ले ओबेरॉनला त्यांच्या बॅकग्राउंडमुळे हॉलिवूडमध्ये प्रवेश करणे कठीण होऊ शकते, अशी भीती वाटत होती. म्हणून त्यांनी आपला जन्म भारतात झाल्याचे सत्य लपवून ठेवले. आयुष्यभर त्या स्वतःला ब्रिटीश म्हणवत राहिली. ओबेरॉनचा जन्म मुंबईत १९११ मध्ये अँग्लो-इंडियन कुटुंबात झाला. (story of indias forgotten hollywood star merle oberon)

‘अशी’ केली चित्रपटांत एन्ट्री
मेर्लेची आई सिंहली तर वडील ब्रिटिश होते. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंब १९१७ मध्ये मुंबईहून कोलकाता येथे स्थलांतरित झाले. जिथे त्यांनी कलकत्ता हौशी थिएट्रिकल सोसायटीमधून अभिनयाच्या जगात प्रवेश केला. १९२५ मध्ये, त्यांनी एक चित्रपट पाहिला, ज्याच्या अभिनेत्रीने त्यांना खूप प्रभावित केले. पुढे १९२८ मध्ये त्या फ्रान्सला गेल्या. येथे लष्कराच्या कर्नलने त्यांची ओळख चित्रपट निर्माता रेक्स इंग्रामशी करून दिली. यानंतर त्यांना चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका मिळू लागल्या. नंतर त्यांनी अनेक चित्रपटांत काम करून प्रसिद्धी मिळवली.

गोरा दिसण्याचा प्रयत्न
मेर्ले ओबेरॉनने त्यांची आशियाई वंशाची ओळख लपवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. त्यांनी आपल्या बोलण्याचा सूर बदलला. ब्रिटीश दिसण्यासाठी त्यांनी अनेक ब्युटी प्रोडक्ट्स वापरले आणि त्यामुळे त्यांची त्वचाही खराब झाली, असं म्हटलं जातं. मेर्लेचा पुतण्या मायकेल कोर्डाने सांगितले की, एकदा त्याने मेर्लेला तिचे जन्मस्थान उघड करण्यास सांगितले, तेव्हा त्या खूप चिडल्या होत्या आणि धमकीही दिली होती. मात्र, नंतर ओबेरॉनच्या बॅकग्राऊंडबद्दल मीडियामध्ये बातम्या येऊ लागल्या. पण त्यांनी ते कधीच मान्य केले नाही. १९७९ मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत, त्यांनी कोणालाही सांगितले नाही की त्या भारताच्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा