सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar), विद्या बालन (Vidya Balan) परेश रावल (Paresh Rawal) अशा एकापेक्षा एक कलाकारांनी भूमिका साकारलेला ‘भुल भूलैय्या’ चित्रपट चांगलाच गाजला होता. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन केले होते. या चित्रपटाची कथा आणि कलाकारांचा अभिनय यामुळे चित्रपट सुपरहीट ठरला होता. आता त्याच चित्रपटाचा रिमेक म्हणजेच ‘भुल भूलैय्या २’ प्रेक्षकांंच्या भेटीला येणार आहे. मात्र या चित्रपटात जुने कलाकार वगळून नवीन कलाकार घेण्यात आले आहेत. चित्रपटाचा दमदार ट्रेलर समोर आल्यानंतर अभिनेत्री विद्या बालनने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.
कार्तिक आर्यनचा (Kartik Aryan) बहुप्रतिक्षित ‘भूल भुलैया २’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘भूल भुलैया’ प्रमाणे, ‘भूल भुलैया २’मध्येही कॉमेडीसह भयपट आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन एक्सॉसिस्ट झाला आहे. या चित्रपटात कियारा अडवाणीने मंजुलिका नावाच्या भूताची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर विद्या बालनने यावर सर्वप्रथम प्रतिक्रिया दिली होती. ‘भूल भुलैया’मध्ये अक्षय कुमारसोबत विद्या बालनही होती. विद्या मंजुलिका ‘भूल भुलैया’मध्ये बनली होती.
विद्या बालनने चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर करताना या “झपाटलेल्या कॉमेडी चित्रपटासाठी भुषण कुमार आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन. ट्रेलर ओळखीचा दिसत आहे.हा हा रोलर कोस्टरची राइड पुन्हा अनुभवण्यासाठी थांबू शकत नाही. भूल भुलैया २ हा चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे, ” असा कॅप्शन लिहला आहे. विद्याने ही पोस्ट तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केली आहे.विद्याच्या या पोस्टवर चाहतेही उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने भूल भुलैया तुझ्याशिवाय अपूर्ण आहे असे म्हणत विद्याचे कौतुक केले आहे.
दरम्यान ‘भूल भुलैया २’ चा ट्रेलर कार्तिक आणि कियारा यांच्यातील ऑन-स्क्रीन किससाठी देखील चर्चेत आला आहे. एवढेच नाही तर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अक्षय कुमारच्या प्रतिक्रियेचीही नेटकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे. चित्रपटात कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, राजपाल यादव, तब्बू, परेश रावल यांनी प्रमूख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरमुळे पून्हा एकदा पहिल्या भुलभूलैय्यासारखाच थरार अनुभवायला मिळणार असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.
हेही वाचा-