×

ऐश्वर्या-जयापासून ते करीना-शर्मिलापर्यंत, ‘या’ आहेत बॉलिवूडच्या प्रेमळ सासू-सुनेच्या जोड्या

सिनेविश्वातील अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये सासू आणि सून यांच्यात चांगली मैत्री नसल्याचे आपण पाहिले आहे. टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये सासू सुनेची जोडी, भांडणे, जुगलबंदी नेहमीच पाहिली आहे. बॉलिवूडच्या रील लाइफमधून बाहेर पडून, जर आपण वास्तविक जीवनात पाहिले तर अनेक अभिनेत्री त्यांच्या सासू-सासऱ्यांसोबत खूप चांगले संबंध ठेवतात. आज या लेखात आम्ही तुमच्यासाठी अशाच काही सासू-सुनेच्या जोडीला घेऊन आलो आहोत, ज्यांचे नाते आई-मुलीच्या सारखे असते. नीतू कपूर-आलिया भट्टपासून ते डेनिस मिलर जोन्स-प्रियांका चोप्रापर्यंत, या आहेत बॉलिवूडच्या सर्वात प्रेमळ सासू सुनेची जोडी पाहूया.

आलिया भट्ट (Alia Bhatt) – नीतू कपूर (Neetu Kapoor)
कपूर घराण्याची सून बनलेली आलिया भट्ट निःसंशयपणे रणबीर कपूरवर खूप प्रेम करते आणि रणबीरही तिच्यावर खूप प्रेम करतो. पण त्याचबरोबर ती तिची सासू नीतू कपूरची लाडकीही आहे. दोघीही अनेकदा एकत्र हँग आउट करताना दिसतात. लग्नाच्या काळातही नीतू आलियाचे कौतुक करताना थकत नव्हती. दोघांचे खरोखरच छान नाते आहे. (these bollywood saas bahu jodi who loves each other)

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)- डेनिस मिलर जोनस (Denis Miller Jonas)
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी २०१८ साली लग्न केले. निकची आई डेनिस मिलर जोनास आणि प्रियांका यांच्यात खूप चांगले संबंध आहेत. अनेकदा त्यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

दीपिका पदुकोण (Deepika Padukone) – अंजू भवनानी (Anju Bhavnani)
दीपिकाचे रणवीर सिंगची आई अंजू भवनानीसोबत चांगले नाते आहे. दीपिकाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, सासू तिची आईसारखी काळजी घेते. अंजूसोबत राहून दीपिकाला कधीच आईची कमतरता जाणवत नाही.

सोनम कपूर (Sonam Kapoor) – प्रिया आहुजा (Priya Ahuja)
लवकरच आई होणाऱ्या सोनम कपूरने अलीकडेच तिची सासू प्रिया आहुजासाठी एक सुंदर नोट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने “हॅपी हॅपी बर्थडे आई! हे वर्ष तुमचे आतापर्यंतचे सर्वोत्तम वर्ष जावो! मी खूप भाग्यवान आहे की तूम्ही माझ्या आयुष्यात आहात. माझे तुझ्यावर प्रेम आहे.” असे लिहले होते. यावरुन ही चिठ्ठी पाहून दोघांचे नाते किती सुंदर असेल हे समजेल.

करीना कपूर (Kareena Kapoor) – शर्मिला टागोर (Sharmila Tagore)
जग शर्मिला टागोर यांना आयकॉन म्हणून ओळखते, तर करीना कपूर खानने त्यांचे वर्णन या जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून केले आहे. करीनाने मुलाखतीत सांगितले होते की, त्यांनीच मला लग्न आणि मुलांनंतरही काम करत राहण्याची प्रेरणा दिली. दुसरीकडे, शर्मिला टागोर करीना कपूरला आपली मुलगी मानतात. दोघीही एकमेकांसोबत प्रेमाने राहतात.

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) – जया बच्चन (Jaya Bachchan)
ऐश्वर्या राय बच्चन आणि जया बच्चन या दोघीही बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत, पण या दोघांनी कधीही आपल्या नात्यात ही गोष्ट येऊ दिली नाही. दोघांमध्ये खूप चांगले नाते आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post