Saturday, June 21, 2025
Home हॉलीवूड जेम्स कॅमेरॉनच्या ‘अवतार २’चा टीझर झाला लीक, व्हायरल होताच उचललं गेलं मोठं पाऊल

जेम्स कॅमेरॉनच्या ‘अवतार २’चा टीझर झाला लीक, व्हायरल होताच उचललं गेलं मोठं पाऊल

जेम्स कॅमेरॉनच्या (James Cameron) ‘अवतार’ या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा काही काळापूर्वी करण्यात आली होती. ‘अवतार’च्या पहिल्या सिक्वेलचे नाव ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ आहे. मार्वलच्या ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ या चित्रपटासोबत ‘अवतार २’ चा पहिला टीझर ६ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र आता ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’चा टीझर ऑनलाइन लीक झाल्याची बातमी समोर आली आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी ‘अवतार २’चा टीझर ऑनलाइन लीक झाल्याची माहिती दिली. लीक झालेल्या फुटेजच्या अनेक लिंक्स वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आल्या होत्या. मात्र आता टीझरचा लीक झालेला कंटेंट सोशल मीडियावरून हटवण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिज्नीने २७ एप्रिल रोजी ‘सिनेमाकॉन’ येथे मोस्ट अवेटेड चित्रपटाच्या नवीन फुटेजचे अनावरण केले. सिनेमाकॉन’ येथे उपस्थित असलेल्या लोकांना 3D चष्मा देण्यात आला होता, ज्यामध्ये जवळजवळ कोणताही संवाद नव्हता. फुटेजमध्ये स्थानिक जमाती व्हेल आणि पेलिकन सारख्या विविध प्रजातींशी संवाद साधत असल्याचे दाखवले आहे. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट पहिल्या चित्रपटाच्या १० वर्षांनंतर तयार झाला आहे. सिक्वेलमध्ये जेकच्या कुटुंबाची कहाणी सांगितली आहे. कॅमेरॉन ‘अवतार २’ फायनल करण्यात व्यस्त आहेत. ते अजूनही न्यूझिलंडमध्ये आहेत.

जेम्स कॅमेरॉन प्री-रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये चित्रपटाबद्दल सांगतांना दिसले होते. त्यांनी सांगितले की, हा चित्रपट सर्वात मोठ्या स्क्रीन आणि सर्वात इमर्सिव्ह 3D तंत्रज्ञानासाठी डिझाइन केले गेले आहे. सिनेमा काय करू शकतो याची मर्यादा तपासण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे ते म्हणाले. जेम्स कॅमेरॉनच्या चित्रपटांनी जगाला वेड लावले आहे. चाहते आता ‘अवतार २’ च्या रिलीझची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

हेही वाचा-

हे देखील वाचा