Sunday, April 5, 2026
Home मराठी ‘भगवा दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही..’ अभिनेते अमोल कोल्हेंनी केली नव्या चित्रपटाची घोषणा, व्हिडिओ होतोय व्हायरल

‘भगवा दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही..’ अभिनेते अमोल कोल्हेंनी केली नव्या चित्रपटाची घोषणा, व्हिडिओ होतोय व्हायरल

सध्या मराठी सिने जगतात अनेक नाविण्यपूर्ण विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. ज्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या मराठी सिने जगताची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ज्यामधून त्यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगभरातील शिवप्रेमींना मोठ्या पडद्यावर ऐतिहासिक चित्रपट पाहायला मिळणार आहे. 

अमोल कोल्हे हे मराठी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेते आणि निर्माते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने आणि ऐतिहासिक भूमिकांनी त्यांनी सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमोल कोल्हे हे विशेषतः त्यांच्या शिवरायांच्या आणि संभाजी राजांच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. अलिकडेच त्यांची ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत अमोल कोल्हेंनी साकारलेल्या संभाजी महाराजांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. आता पुन्हा एकदा अशीच एक ऐतिहासिक दमदार भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अभिनेते अमोल कोल्हे यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवरुन त्यांच्या या आगामी चित्रपटाचा छोटासा टिझर प्रदर्शित केला आहे. ज्यामध्ये अमोल कोल्हे यांच्या आवाजातील भगवा दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही असे म्हणताना दिसत आहेत. ‘शिवप्रताप गरुडझेप’ असे या चित्रपटाचे नाव असून जगदंब क्रिएशनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत असल्याचे दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत अमोल कोल्हे यांनी मराठी स्वाभिमानाचा अंगार.काल,आज आणि उद्याही,शिवप्रताप – गरुडझेप २०२२ असा कॅप्शन दिला आहे. त्यामुळे यावर्षी अमोल कोल्हे यांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

https://www.instagram.com/tv/CfQInGiKS7D/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान अभिनेते अमोल कोल्हे त्यांच्या सिने जगतातील भूमिकां इतकेच राजकीय भूमिकांसाठीही प्रसिद्ध आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिरुर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. सध्या ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार आहेत.

हे देखील वाचा