Sunday, March 8, 2026
Home अन्य ‘मी चित्रपटात एंट्री घेतली, त्याच दिवशी बाबांनी Exit घेतली’ मराठी अभिनेत्याच्या पोस्टने हळहळले मीडिया जगत

‘मी चित्रपटात एंट्री घेतली, त्याच दिवशी बाबांनी Exit घेतली’ मराठी अभिनेत्याच्या पोस्टने हळहळले मीडिया जगत

एक लोकप्रिय युट्यूबर ते अभिनेता असा यशस्वी प्रवास करणारा सुमित चव्हाणवर (Sumeit Chavan) दुखःचा डोंगर कोसळला असून सुमीतच्या वडिलांचे निधन झाले आहे. सध्या सोशल मीडियावर त्याची एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर भावूक झालेला दिसत आहे. सुमितची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्याही भावनिक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. 

सध्या सोशल मीडिया हे तरुणांसाठी आपली कला सादर करण्याचे एक सर्वोत्तम मंच मिळाला आहे. अनेक तरुण कलाकार रिल्सस्टार सोशल मीडियावरुन सध्या लोकप्रिय होताना दिसत आहेत. सुमित चव्हाण हा सुद्धा असाच एक लोकप्रिय युट्यूबर म्हणून प्रसिद्ध आहे. युट्यूबर ते लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुमितने सोशल मीडियावरुन आपल्या वडिलांच्या निधनानंतर लिहलेली सोशल मीडियापोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सुमितने आपल्या वडिलांच्या अनेक आठवणी सांगत दुःख व्यक्त केले आहे.

या पोस्टमध्ये सुमितने “बाप माणुस गेला.  दुखापासून खूप लांब, आनंदात लपून बसलो होतो, अचानक दुःख येतं आणि तुम्हाला धप्पा देतं, तुम्ही Out होता. 2001 मध्ये बाबांची मिल बंद झाली, मुलाचं शिक्षण मुंबईतच झालं पाहिजे, म्हणून ते मुंबईत थांबले, रिक्षा चालवुन आमचं शिक्षण पूर्ण केलं. शाळा, कॉलेज आणि परवा पर्यंत शूट साठी मला त्याच रिक्षातून सोडत होते , त्यांची सगळी स्वप्न करत होतो, पण काही स्वप्न राहून गेली, गेले 21 वर्ष रिक्षा चालवली. आपल्या स्वतःच्या कार मध्ये बसून फिरवायच होतं, गावाला मोठा बंगला बांधायचा होता, बहिणीचं लग्न करून दयायचं होतं, मला मोठया पडदयावर बघायचं होत. पण मी हे सगळं नाही करू शकलो पूर्ण,मला उशीर झाला,आयुष्यभर ह्या गोष्टी मनाला टोचत राहतील,”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sumeit Chavan (@itsuch__)

 

“काय पण साला नशीब आहे, ज्या दिवशी मी Film Industry मध्ये Entry घेतली , त्याच दिवशी बाबांनी Exit घेतली, एवढी वर्ष रिक्षा चालवली, आणि रिक्षातच आईच्या कुशीत जीव सोडला. बाबा तुम्ही आता star झालात, वरून बघत रहा, मी सगळी स्वप्न पूर्ण करेन, काळजी नका करू. ते कट्टर शिवसैनिक होते, त्यांना आपल्या आजूबाजूला गर्दी करायला आवडत होती, रात्री अचानक गेले तरी त्याच्यासाठी गर्दी झाली, ही त्यांनी कमावलेली माणसं होती. मी खूप प्रेम करतो तुमच्यावर.. हे एकदा तुम्हाला बोलायचं होत,  बाबा आपण पुन्हा भेटू , गप्पा मारू, तो पर्यंत आईची बहिणीची मी काळजी घेईन, राहिलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याची ताकत मला माझ्या जवळच्या मित्रांनी दिलीय. तुम्ही खूप धावपळ केली आता आराम करा,” अशा भावूक शब्दात सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

 

हे देखील वाचा