Wednesday, September 2, 2026
Home बॉलीवूड बिग ब्रेकिंग! अभिनेते राज बब्बर यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

बिग ब्रेकिंग! अभिनेते राज बब्बर यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

हिंदी सिने जगतातून सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली असून राज बब्बर यांना खासदार आमदार न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 26 वर्षे जुन्या प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज बब्बर (Raj Babber) यांनी एका मतदान अधिकाऱ्याला मारहाण केली होती. या प्रकरणाबाबत, 2 मे 1996 रोजी मतदान अधिकाऱ्याने वजीरगंजमध्ये एफआयआर दाखल केला होता. त्यावेळी राज बब्बर हे समाजवादी पक्षाचे उमेदवार होते. या शिक्षेच्या बातमीने सिने जगतात मोठी खळबळ माजली आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, मिळालेल्या माहितीनुसार, माजी अभिनेता आणि राजकारणी राज बब्बर यांना खासदार/आमदार न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय 8500 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सध्या राज बब्बर हे काँग्रेसचे नेते आहेत, आणि ते काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज बब्बर या निर्णयाला वरच्या न्यायालयात आव्हान देऊ शकतात.

हे प्रकरण २६ वर्षे जुने म्हणजे १९९६ चे आहे. त्यावेळी राज बब्बर हे समाजवादी पक्षाचे उमेदवार होते. 2 मे 1996 रोजी मतदान अधिकारी श्री कृष्ण सिंह राणा यांनी वजीरगंज पोलीस ठाण्यात राज बब्बर आणि इतर अनेक लोकांविरुद्ध तक्रार नोंदवली होती. ज्यामध्ये राज बब्बर यांनी त्यांच्या समर्थकांसह मतदान केंद्रात घुसून ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना गैरवर्तन आणि मारहाण केल्याचे म्हटले होते. याशिवाय बब्बर आणि त्यांच्या समर्थकांनी सरकारच्या कामात अडथळा आणल्याचेही त्यांनी सांगितले. या भांडणात अनेक पोलिंग एजंट जखमी झाले.

या प्रकरणाच्या तपासानंतर 23 मार्च 1996 रोजी राजब्बर यांच्याविरुद्ध कलम 143, 332, 353, 504, 323 आणि 188 अंतर्गत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. ज्यावर न्यायालयाने आज म्हणजेच गुरुवारी निर्णय दिला आहे. दरम्यान  राज बब्बर यांनी 80 च्या दशकातील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यानंतर 1989 मध्ये व्हीपी सिंह यांच्या नेतृत्वाखाली ते जनता दलात सामील झाले. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

बापरे! केस कापणाऱ्या व्यक्तीकडून ‘हे’ काय घडलं, रितेश देशमुखने स्वत:वरच काढला राग, पाहा व्हिडिओ

नाकातील नथ अन् राजेशाही लूक खुलवतोय प्रार्थना बेहरेचे सौंदर्य

‘कॉर्पोरेट’ चित्रपटाला 16 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दिग्दर्शक मधुर भंडारकरने केला ‘हा’ महत्वाचा खुलासा

हे देखील वाचा