Sunday, April 19, 2026
Home टेलिव्हिजन अभिनेत्री निक्की तांबोळीने ट्रोल करणाऱ्यांना सुणावले खडेबोल म्हणाली ‘मी रडले तरी…’

अभिनेत्री निक्की तांबोळीने ट्रोल करणाऱ्यांना सुणावले खडेबोल म्हणाली ‘मी रडले तरी…’

हिंदी सिने जगतात तसेच छोट्या पडद्यावरी अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील पोस्टमुळेच नेहमी चर्चेत असतात. यामध्ये अभिनेत्री निक्की तांबोळीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. बिग बॉस आणि खतरोंं के खिलाडी सारख्या कार्यक्रमांतून लोकप्रिय झालेली निक्की तांबोळी (Nikki Tamboli)  सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तसेच कोणत्या ना कोणत्या कारणाने नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येत असते. अलिकडेच निक्कीला एका फोटोमुळे नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केले होते त्यानंतर आता अभिनेत्रींने कडक शब्दात त्यांना खडेबोल सुनावले आहेत. 

निक्की तांबोळी अलीकडेच तिच्या एका फोटोशूटमुळे चर्चेत आली होती, ज्यामध्ये तिने तिच्या पॅन्टचे बटण उघडून फोटोशूट केले होते. निक्की तांबोळी तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल म्हणाली की, ‘मला टीव्ही आणि चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत पण त्यापैकी एकही विशेष रोमांचक नाही. मला असे वाटते की मी जर एखादा चित्रपट करत असेल तर मला त्याचा अभिमान वाटला पाहिजे जेणेकरून मला परत जाऊन तो चित्रपट पहावासा वाटेल.

विमानतळावर सिद्धू मुसेवालाबद्दल बोलताना निक्की रडली आणि त्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं. याबद्दल बोलताना निक्की म्हणाली, “मला सिद्धूचे काम खूप आवडते आणि मी बिग बॉसमध्ये असतानाही याबद्दल बोलले होते. त्याच्या मृत्यूबद्दल ऐकून मी खूप भावूक झाले त्यामुळेच मला रडायला आले,”

याबद्दल बोलताना निक्की तांबोळी म्हणाली की, “ती माझी अगदी स्वाभाविक प्रतिक्रिया होती. माझ्या भावाचे निधन झाले तेव्हाही मला ट्रोल करण्यात आले आणि खतरों के खिलाडीच्या वेळी मी हसत होते. आता मी रडले तेव्हाही लोकांनी मला ट्रोल केले. त्यामुळे मी हसले किंवा रडले तरी मला ट्रोल केले जाईल. त्यामुळे आता मला काही फरक पडत नाही,” निक्की म्हणाली की तिला टीका आवडते कारण यामुळे तिला अधिक गोष्टी करण्याची ऊर्जा मिळते.

हे देखील वाचा