Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड विकी कौशलचा भाऊ महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीला करतोय डेट? रणवीरनेच दिलाय दुजोरा

विकी कौशलचा भाऊ महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीला करतोय डेट? रणवीरनेच दिलाय दुजोरा

बॉलिवूडमध्ये अफेअरच्या चर्चा होतच असतात. आता विकी कौशलचा भाऊ सनी कौशलच्या रिलेशनशीबद्दल चर्चा होत आहे. तो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आणि अभिनेत्री शर्वरी वाघबरोबर रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जातंय.

या चर्चेला रणवीर सिंगने केलेल्या एका विधानामुळेही दुजोरा मिळाला. रणवीर नुकताच ‘कॉफी विथ करण’ शोच्या सातव्या पर्वात आलिया भट्टसह उपस्थित होता. यावेळी करण जोहरने रणवीरला विचारले की कॅटरिना कैफ-विकी कौशल कोणासह डबल डेट करू शकतात? त्यावर रणवीरने सनी आणि शर्वरी यांचं नाव घेतलं. त्यानंतर त्याच्या रिलेशनशीपच्या बातम्यांनी अधिक जोर धरलाय. शर्वरी कॅटरिना-विकी यांच्या लग्नातही उपस्थित होती.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा