Tuesday, September 29, 2026
Home › मराठी › विठ्ठल भक्तीत हरपलं ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अश्विनी महांगडेचं देहभान, वारकऱ्यांबरोबरचा व्हिडिओ व्हायरल

विठ्ठल भक्तीत हरपलं ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अश्विनी महांगडेचं देहभान, वारकऱ्यांबरोबरचा व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्र सध्या विठ्ठल भक्तीत रंगून गेला आहे. आषाढी एकादशी निमित्त वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेत. अशातच मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे ही देखील वरीत सहभागी झाली होती. तिने तिच्या वारीतील अनुभव देखील सर्वांबरोबर शेअर केला आहे.

तिने वारीत सहभागी झाल्यानंतरचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच तिने म्हटले आहे की, ‘स्वर्गी पाहता न येणारा असा हा सुख सोहळा…’ तिच्या वारीच्या पोस्टला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे. तिने वारकऱ्यांना बरोबर जेवणही केल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे.

अश्विनीने स्वराज्यरक्षक संभाजी आणि आई कुठे काय करते या मालिकेत काम केले आहे.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा