Friday, November 22, 2024
Home अन्य बिग बॉस: बिग बॉसच्या घरात नवीन पाहुण्यांचे आगमन, येणारा माजी स्पर्धक म्हणजे विवादाला आमंत्रण

बिग बॉस: बिग बॉसच्या घरात नवीन पाहुण्यांचे आगमन, येणारा माजी स्पर्धक म्हणजे विवादाला आमंत्रण

प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन हा बिगबॉस शो मुळे प्रकाशझोतात आला. बिगबॉस या विवादित कार्यक्रमातील एका पर्वाच्या काही स्पर्धकांपैकी एक स्पर्धक असलेला राहुल महाजन पुन्हा एकदा बिगबॉसच्या घरात जाण्यासाठी सज्ज झाला आहे. आता पुन्हा राहुल बिगबॉसच्या घरात जाणार म्हणजे नवीन हंगामे लोकांना नक्कीच पहायला मिळणार हे नक्की.

राहुलचे आयुष्य नेहमीच वादविवादांनी भरलेले होते. तो नेहमीच त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. राहुलवर त्याच्या आधीच्या डिंपी गांगुली आणि श्वेता सिंग या दोन्ही पत्नींनी घरगुती हिंसेचे आरोप लावले होते. शिवाय राहुल ड्रग्स स्कँडलमध्येही देखील अडकला होता.

राहुल २०१८ मध्ये नतालिया इलिना या रशियन मुलीसोबत तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला. नतालिया ही मूळची कजाकिस्तानची आहे. नतालियाने हिंदू धर्माचा स्वीकार केला असून, राहुल आणि नतालिया हे सध्या अध्यात्माच्या मार्गावर आहेत. राहुलने एका मुलाखतीत सांगितले की, ” आमच्या नात्यात समतोल राखण्यासाठी आम्ही एकमेकांना पाहिजे तेवढी स्पेस देतो. एकमेकांच्या कामात आणि आयुष्यात ढवळाढवळ करत नाही.” तो पुढे म्हणाला, ” मी नतालियाला नेहमीच शंकर पार्वतीचे उदाहरण देत असतो. त्यांच्यासारखे आपण आपल्या नात्यात राहिले पाहिजे. त्यांनी आम्ही दोघेही आदर्श मानतो. आम्ही दोघं एकत्र भगवतगीता देखील वाचतो. बिगबॉसच्या घरात मी महिलांपासून दूर राहणार आहे. माझे वैवाहिक आयुष्य खूप सुखात आणि आनंदात चालू आहे. आता मला आमच्या नात्यात कोणत्याच समस्या नकोय.”

राहुलला बिग बॉस सिझनच्या १४ व्या पर्वात चॅलेंजर म्हणून सहभागी केले जाणार आहे. आता राहुलची बिग बॉस मध्ये एन्ट्री झाल्यावर काय होते हे बघणे महत्वाचे राहील.
आधीच्या दोन अयशस्वी लग्नांमुळे

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा