चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री आजकाल त्यांच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असतात. बऱ्याचवेळा त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतात. बॉलिवूड अभिनेत्री तर चर्चेत असतातच, परंतु दक्षिणी अभिनेत्रीही यात काही कमी नाहीत.
दक्षिण भारतीय अभिनेत्री वरलक्ष्मी सारथकुमार सध्या तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे. वरलक्ष्मीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे चाहत्यांकडून खूप पसंत केले जात आहे. या फोटोंमध्ये वरलक्ष्मी खूपच बोल्ड दिसत आहे. यात तिने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच, तिने केस मोकळे सोडले आहेत. तिच्या फोटोतील अदा चाहत्यांना वेड लावत आहेत.
वरलक्ष्मी सारथकुमारने 2012 मध्ये ‘पोडा पोडी’ या तामिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि त्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्रीचा पुरस्कारही देण्यात आला होता.
तसेच, अभिनेत्रीने 2014 मध्ये ‘मानिक्य’ या चित्रपटातून कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. 2015 मध्ये वरलक्ष्मीने ‘कसाबा’ चित्रपटातून मल्याळम चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तसेच, तिने ‘तेनाली रामकृष्ण’ चित्रपटातून 2019 मध्ये तेलुगू चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले.
वरलक्ष्मी सारथकुमार हे नाव तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपटात खूप लोकप्रिय आहे. अभिनयाव्यतिरिक्त वरलक्ष्मी तिच्या ग्लॅमरस फोटोमुळे नेहमी चर्चेत असते. तसेच, ही अभिनेत्री सध्या तिच्या 4 आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे.










