Saturday, June 21, 2025
Home बॉलीवूड ईदच्या दिनी मन्नतच्या बाल्कनीतून शाहरुखने चाहत्यांना दिल्या शुभेच्छा, लहान अबरामला पाहून खुश झाले चाहते

ईदच्या दिनी मन्नतच्या बाल्कनीतून शाहरुखने चाहत्यांना दिल्या शुभेच्छा, लहान अबरामला पाहून खुश झाले चाहते

अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) त्याच्या चाहत्यांसाठी काहीही करायला तयार आहे. कोणताही सण असो वा वाढदिवस, किंग खान नेहमीच त्याच्या चाहत्यांना खुश करतो. शाहरुखने ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी असेच काहीसे केले. करोडो चाहत्यांच्या गर्दीत तो मुलगा अबरामसोबत बाल्कनीत दिसला. अभिनेत्याने त्याच्या मुंबईतील घर मन्नत बाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्याला पाहिल्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांमध्ये आनंद शिगेला पोहोचला होता.

ईदच्या दिवशी चाहत्यांना दिसला त्यांचा चंद्र
रविवारी (१० जुलै) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक फॅन अकाऊंट्सने शाहरुख खानचे धाकटा मुलगा अबरामसोबतचे फोटो शेअर केले होते. तो त्याच्या आलिशान घर मन्नतच्या प्रवेशद्वाराच्या वर असलेल्या लोखंडी बाल्कनीत उभा होता, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले गेले आहेत. चाहत्यांना भेटण्यासाठी शाहरुखने पांढरा टी-शर्ट, निळा डेनिम्स, बूट आणि गडद सनग्लासेस घातले होते. तर अबरामने लाल रंगाचा टी-शर्ट, काळी पँट आणि स्नीकर्स घातले होते. (shahrukh khan greet fans from mannat on eid)

शाहरुख खानचे चित्रपट
सध्या शाहरुख ‘पठाण’च्या रिलीझची तयारी करत आहेत. हा चित्रपट यशराज फिल्म्सचा असून सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आहे. यात शाहरुख मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) देखील आहेत आणि हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी रिलीझ होणार आहे. शाहरुख ‘जवान’ चित्रपटात निर्माता एटलीसोबत काम करत आहे. हा चित्रपट २ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांशिवाय शाहरुख राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ या चित्रपटातही दिसणार आहे. २२ डिसेंबर २०२३ रोजी रिलीझ होणार्‍या या चित्रपटात शाहरुखसोबत तापसी पन्नू (Taapsee Pannu) देखील आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा