सध्या सोशल मीडियावर एकच विषय रंगला आहे, तो म्हणजे अभिनेत्री सुष्मिता सेन आणि व्यावसायिक ललित मोदी हे एकमेकांना डेट करत असल्याचा. त्यांच्या रिलेशनशिपबद्दल सोशल मीडियावर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर नेटकरी या अफेअरच्या बातमीवर मजेशीर मीम्स शेअर करत आहेत. या दोघांचे नात चाहत्यांच्या पचनी पडत नाहीये. ट्विटर, इंस्टाग्रामवर युजर्स एकापेक्षा एक मीम्स शेअर करताना दिसत आहेत. चला तर या दोघांच्या नात्याबद्दल नेटकरी मीम्समधून काय म्हणतायेत जाणून घेऊया…
अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदीवरील मीम्स
अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदी (Sushmita Sen And Lalit Modi) यांच्यावर नेटकरी तुफान मीम्स शेअर करत आहेत. काही युजर्स सुष्मिताच्या एक्स बॉयफ्रेंड्सची यादी शेअर करत आहेत, तर अनेकजण सुष्मिताच्या मागील आयुष्याबद्दल टीका करणाऱ्या पोस्ट शेअर करत आहेत.
#SushmitaSen pic.twitter.com/hD6sqt4Mra
— Manoj Agniveer Tiwari(Parody)???? (@ManojMujra) July 14, 2022
सुष्मिता मागील वर्षी रोहमन शॉल (Rohman Shawl) याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यांच्या ब्रेकअपला आता फक्त ६ महिनेच झाले आहेत. अशात नेटकरी तिला ट्रोल करू लागले आहेत. एका युजरने अभिनेत्रीची फिरकी घेत लिहिले की, “सर्व प्रयत्न करा आणि त्यानंतर योग्य निवडा.”
Sab Kuch Try Karo Phir Sahi Chuno #Sushmitasen pic.twitter.com/fixJXKuWOp
— Pulkit????????❤️ (@pulkit5Dx) July 14, 2022
यासोबतच एका युजरने अक्षय कुमार आणि राजपाल यादव यांच्या ‘फिर हेरा फेरी’ या सिनेमातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर लिहिण्यात आले आहे की, “भावा पैसे असतील, तर काहीही होऊ शकते.”
Lalit Modi announces he and Sushmita Sen are a couple; posts photos with his 'better half' on Instagram. #SushmitaSen #LalitModi ❤ pic.twitter.com/psBksSHCL8
— Deva Karhana Gujjar ???????? (@DevaGurjar74) July 14, 2022
एका युजरने ५६ वर्षीय ललित मोदी यांचे सर्व फोटो शेअर करत लिहिले की, “मला ट्विटरवरचे नवीन फिचर खूप आवडत आहे. तुम्ही रिफ्रेश करताच, कोणी ना कोणी लग्न केल्याचे दिसतेच दिसते.”
I like this new feature of Twitter, as in everytime you refresh it, someone gets married..
3 minute , decision ????????????????????#SushmitaSen #lalitmodi pic.twitter.com/9qQjIlx4WS
— Adheera_3 (@Adheera_3) July 14, 2022
Main hoon Lalit#LalitModi#SushmitaSen pic.twitter.com/n5L7JMFjss
— ͏ ͏ (@Azr2__) July 14, 2022
काही चाहते सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि ललित मोदी (Lalit Modi) यांना त्यांच्या या नवीन नात्यासाठी शुभेच्छाही देत आहेत. ललित मोदी यांनी सुष्मितासोबत खूप जुने आणि रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. त्यांनी अभिनेत्रीसोबत आतापर्यंतच्या आपल्या भेटीमार्फत प्रवास शेअर केला आहे. ललित मोदी यांनी म्हटले आहे की, ते लवकरच अभिनेत्रीसोबत लग्न करणार आहेत. आता सर्वत्र सुष्मिता आणि ललित मोदींच्या डेटिंगच्या बातम्यांनी जोर धरला आहे.
सुष्मिताबद्दल थोडक्यात
अभिनेत्री सुष्मिता सेन ही ४६ वर्षांची असून तिचा जन्म १९ नोव्हेंबर, १९७५ रोजी हैदराबादमध्ये झाला होता. तिने वयाच्या १८व्या वर्षी फेमिना मिस इंडिया आणि त्यानंतर मिस युनिव्हर्स याचा किताब पटकावत देशाची छाती गर्वाने फुगवली होती. सुष्मिता हिने आतापर्यंत लग्न केलेले नाही. तिचे नाव अनेक अभिनेते आणि व्यावसायिकांसोबत जोडले गेले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
फक्त सुष्मिता सेनच नव्हे, ‘या’ अभिनेत्रींनीही बड्या उद्योगपतींना ओढले होते प्रेमाच्या जाळ्यात
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ललित मोदींना करतेय डेट, लवकरच लग्न करणार असल्याची दिली माहिती